एलपीजी सिलिंडरच्या किमती दर महिन्याला अद्ययावत केल्या जातात. या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ नोव्हेंबर २०२३ रोजी १९ किलो गॅस सिलिंडरची किंमत १०३ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
आज पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली ते मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या दरात घसरण झाली आहे. विशेष म्हणजे ही कपात फक्त व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये ५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. याचा अर्थ घरगुती सिलिंडरची किंमत स्थिर आहे. तुमच्या शहरात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत काय आहे ते जाणून घेऊ यात.
कोणत्या शहरात दर किती आहेत?
किमतीत वाढ झाल्यानंतर आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत
शहर जुनी किंमत नवीन किंमत
दिल्ली १८३३ रुपये १७५५.५० रुपये
मुंबई १७८५.५० रुपये १७२८ रुपये
चेन्नई १९९९.५० रुपये १९४२ रुपये
कोलकाता १९४३ रुपये १८८५.५० रुपये
हेही वाचाः RBI ने Axis Bank वर केली मोठी कारवाई अन् ठोठावला ९० लाखांचा दंड, नेमकं कारण काय?
देशांतर्गत सिलिंडरचे दर स्थिर
देशात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १ नोव्हेंबर २०२३ रोजीही त्यांच्या किमती बदलल्या नाहीत. याचा अर्थ राजधानी दिल्लीत १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९०३ रुपये आहे.