Commercial LPG Cylinder Price Today: एलपीजी गॅस सिलिंडर म्हणजे सामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. गॅसच्या किंमती वरखाली होतात तसा सामान्य घरांमधला महिन्याचा ताळेबंद वरखाली होत असतो. त्यामुळे सामान्य घरांचं लक्ष दर महिन्याच्या एक तारखेकडे असतं. या दिवशी सिलेंडर्सच्या किंमतीमध्ये होणारे चढउतार त्यांच्या महिन्याच्या ‘अर्थसंकल्पा’वर परिणाम करणारे ठरतात. याही महिन्याच्या एक तारखेपासून एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. पण सामान्यांना त्याचा थेट फटका बसणार नाही. कारण ही दरवाढ फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडर्सच्या किमतींमध्ये झालेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एक मार्चपासून व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या एलपीजी सिलेंडर्सच्या किमतींमध्ये तब्बल २५ रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सिलेंडर्सचे दर दिल्लीमध्ये १७९५ रुपये तर मुंबीत १७४९ रुपयांवर गेले आहेत. चेन्नई व कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे १९६० आणि १९११ रुपये इतके झाले आहेत. त्याचवेळी घरगुती वापराच्या नियमित सिलेंडर्सच्या किमतीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ!

१ फेब्रुवारी रोजीही गॅस सिलेंडर पुरवठादार कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या सिलेंडर्सच्या किमती वाढवल्या होत्या. १ फेब्रुवारी रोजी १४ रुपयांनी या किमती वाढवण्यात आल्या होत्या. आता पुन्हा त्यात २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

१ मार्च रोजी व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमती कुठे किती?

दिल्ली – १७९५
मुंबई – १७४९
कोलकाता – १९११
चेन्नई – १९६०.५०
चंदीगड – १८१६
बंगळुरू – १८९५
इंदौर – १९०१
अमृतसर – १८९५
जयपूर – १८१८
अहमदाबाद – १८१६

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lpg gas cylinder rates for commercial use 19 kg increased by 25 rupees from 1st march pmw