LPG Price : आज ऑगस्ट महिन्याची पहिली तारीख असून, तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात केली आहे. यापूर्वी जुलै महिन्यात दरात वाढ करण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी कपात केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता १६८० रुपये मोजावे लागतील, पूर्वी ही किंमत १७८० रुपये होती. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
याआधी जुलै महिन्यात तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलिंडर ७ रुपयांनी वाढ केली होती. दिल्लीत १९ किलो एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत १,७७३ रुपयांवरून १,७८० रुपये प्रति सिलिंडर झाली होती, परंतु आता त्याची किंमत १,६८० रुपये आहे. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता १६८० रुपये आहे, तर कोलकात्यात १८२०.५० रुपये, मुंबईत १६४०.५० रुपये, चेन्नईमध्ये १८५२.५० रुपये आहे.
हेही वाचाः फ्लिपकार्टमधील ‘बन्सल’ युगाचा अस्त, बिन्नी यांनीच कंपनीला विकले, आता पुढे काय?
मे-जूनमध्येही भाव घसरले
मे आणि जून महिन्यात एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट दिसून आली. १ जून २०२३ रोजी किमती ८३.५ रुपयांनी कमी केल्या. तर यापूर्वी १ मे २०२३ रोजी व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७२ रुपयांनी कमी करण्यात आली होती. यानंतर आता किमतीत १०० रुपयांची कपात ही एक मोठी कपात आहे. यामुळे एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारित केली जाते.
हेही वाचाः जेट एअरवेज पुन्हा उड्डाण करणार, DGCA ने एअरलाइन कंपनीला दिली मंजुरी
घरगुती सिलिंडरची किंमत काय?
१४.२ किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीत १,००३ रुपयांना उपलब्ध आहे. मे महिन्याच्या किमतीनुसार, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत १,०२९ रुपये, १,००२.५० रुपये आणि १,०१८.५० रुपये आहे. सध्या घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ झालेली नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ही वाढ केली आहे.