LPG Cylinder New Rates : सणासुदीच्या तोंडावर आज १ नोव्हेंबरला व्यावसायिक LPG गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर ठेवल्या, पण व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १०१.५० रुपयांनी वाढ केली. १०१.५० रुपयांच्या वाढीनंतर आता राजधानी दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत १८३३ रुपये झाली आहे. मात्र, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या महिन्यातही भाव वाढले होते
तेल कंपन्यांनी गेल्या महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजेच १ ऑक्टोबरला व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २०९ रुपयांनी वाढल्या होत्या. मात्र, सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती १५७ रुपयांनी कमी केल्या होत्या.
हेही वाचाः रतन टाटांचा मोठा विजय, सिंगूर वादात बंगाल सरकार टाटा मोटर्सला ७६६ कोटींची भरपाई देणार
घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर
आज देशात आमच्या आणि तुमच्या स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्या १४.२ किलो एलपीजीच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये एलपीजीच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या होत्या.
हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना सेवानिवृत्तीनंतर बनेल आधार, दरमहा ९२५० रुपये मिळणार, पण कसे?
१४ किलो LPG सिलिंडरची किंमत किती?
३० ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्यांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केली, तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ४०० रुपयांपर्यंत वाढवले. यानंतरही या लाभार्थ्यांना १०० रुपयांचा अतिरिक्त लाभ देण्यात आला होता. सध्या सामान्य ग्राहकांसाठी १४.२ किलोचा एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.