रिटेलवर लक्ष केंद्रित केलेली आणि डिजिटल पातळीवर अतिशय सक्षम असलेली नॉन बँकिंग वित्तीय कंपनी, एल अँड टी फायनान्स (एलटीएफ) द्वारे प्लॅनेट (पर्सनलाइझ्ड लेंडिंग अँड असिस्टेड नेटवर्क्स) ऍप्लिकेशनने ५० लाखांहून अधिक डाऊनलोडचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. या अ‍ॅपमुळे एकूण २३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वित्तीय व्यवसाय आणि ४४० कोटी रुपयांपेक्षा अधिक संकलन साध्य झाले आहे. आतापर्यंत प्लॅनेट ऍपने देशभरातून ७५ लाखांहून अधिक व्यवहार केले आहेत. त्याचबरोबर ग्रामीण तसेच शहरी या दोन्ही भागात पूर्णपणे डिजिटल माध्यमातून वित्तीय वितरण आणखी बळकट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च २०२२ पासून कार्यान्वित करण्यात आलेले प्लॅनेट ऍप हे प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना विविधांगी वित्तीय उत्पादने आणि सेवा अतिशय सहजरित्या सुरक्षित आणि सहजरित्या उपलब्ध होतील, यासाठी तयार करण्यात आलेले आहे. विस्तृत आणि मोठी फिनेटक कंपनी (‘फिनटेक अॅट स्केल”) बनण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एलटीएफने आपल्या विस्तृत संख्येतील ग्राहकांना सर्वोत्तम पर्याय दिलेले आहेत.

हेही वाचाः Narayan Murthy Success Story : IIT तील शिक्षणानंतर पत्नीकडून व्यवसायासाठी घेतलं १० हजारांचं कर्ज, आता आहेत ३७ हजार कोटींचे मालक

ऍपने ग्राहकसंख्येत ओलांडलेल्या महत्वाच्या टप्प्याबद्दल आनंद व्यक्त करताना एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दिनानाथ दुभाषी म्हणाले, “ प्लॅनेट ऍपला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या चमूच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा उत्तम पुरावा आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या घरातूनच अतिशय आरामात वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन करण्यास आमचे ऍप करत असलेली मदत पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महत्वाचे म्हणजे आमच्या ग्राहकवर्गातील पाच लाखांहून अधिक ग्रामीण महिला आणि ९५ हजारांहून अधिक शेतकरी त्यांच्या सेवांच्या गरजा डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या ऍपचा वापर करत आहेत. आमचे लक्ष नेहमी ग्राहकांना सवोत्तम अनुभव प्रदान करणे आणि नाविन्यपूर्ण आर्थिक संसाधने सादर करण्यावर असते. भविष्यात आम्ही नवीन वैशिष्ट्ये सादर करून प्लॅनेट ऍपमध्ये अधिकाधिक सुधारणा आणि विस्तार करत राहू आणि भारतात डिजिटल पद्धतीने वित्तसहाय्य मिळवण्यासाठी हे ऍप एक प्रमुख केंद्र होईल, हे सुनिश्चित करू. उत्कृष्टतेसाठी कंपनीची अतूट वचनबद्धता आहे आणि एक कोटी डाउनलोडचा पुढचा टप्पा आमच्या अगदी आवाक्यात आहे.”

हेही वाचाः Money Mantra : HDFC, ICICI, SBI, Canara, BoB आणि पोस्ट ऑफिस यातील कोणती बँक FD वर देतेय सर्वाधिक व्याज? जाणून घ्या

प्लॅनेट ऍप हे गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअरवरील ४.३ गुणांसह सर्वोच्च-श्रेणी प्राप्त केलेले वित्तीय ऍप्सपैकी एक आहे. या ऍपच्या यशाचे श्रेय त्याचा साधेपणा, सर्वसमावेशक वैशिष्ट्ये आणि ग्राहकांच्या समाधानाची बांधिलकी यांना दिला जाऊ शकते. विविध पार्श्वभूमी असलेल्या ग्राहकरुपी व्यक्तींच्या आर्थिक गरजा पूर्ण करताना त्यांची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सक्षम बनवणे आणि आर्थिक समावेशनाला पाठबळ देण्याचा कंपनीचा व्यापक दृष्टीकोन असून तो साध्य करण्यात हे ऍप यशस्वी ठरले आहे. तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करून, कंपनी लाखो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाली आहे. या वापरकर्त्यांत ग्रामीण आणि दुर्गम भागातील सहा लाखांहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक प्रभाव पडत आहे. अलीकडेच ऍपवर थेट उपलब्ध झालेला ग्रामीण गट कर्ज आणि मायक्रो फायनान्स व्यवसायाने सुमारे ६००० हून अधिक ग्राहक निर्माण केले असून, त्यापैकी ४५०० हून अधिक ग्राहक हे अगदी अलीकडच्या काळातील आहेत.

आर्थिक क्षितीज विस्तारत असताना, प्लॅनेट अॅप हे तंत्रज्ञान व्यक्तींना कसे सक्षम बनवू शकते आणि देशभरातील लाखो व्यक्तींच्या गरजा पूर्ण करून वित्तविषयक गुंतागुंत कशी सुलभ करू शकते, याचे एक उत्तम आणि चमकदार उदाहरण आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lt finance planet app crosses 5 million downloads vrd