पुणे : वाहनांसाठी सुट्या भागांच्या पुरवठ्यातील कॅनडास्थित जागतिक कंपनी मॅग्ना इंटरनॅशनलने चाकणमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे. हा अत्याधुनिक प्रकल्प ६५ हजार चौरस फुटांवर विस्तारलेला आहे. पश्चिम भारतातील वाहन निर्मितीतील ओईएम पुरवठादार ग्राहकांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. मोटारींसाठी अत्याधुनिक लॅचेस आणि आरसे यांच्या उत्पादनासाठी हा समर्पित प्रकल्प असेल. नव्या प्रकल्पामुळे मॅग्नाच्या भारतातील विस्तारात आणखी वाढ होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या तिच्या देशभरात १४ उत्पादन आणि जुळणी सुविधा असून, पाच अभियांत्रिकी, उत्पादन आणि विक्री कार्यालये आहेत. या सर्वत्र मिळून कंपनीचे एकूण मनुष्यबळ हे ७ हजार कर्मचारी असे झाले आहे. चाकणमधील नवीन विस्तारामुळे पुढील तीन वर्षांत ३०० हून अधिक नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. याबाबत मॅग्ना एमएमएलचे अध्यक्ष जेफ हंट म्हणाले की, चाकणमध्ये प्रगत उत्पादन क्षमता आणण्यासाठी आणि या भागाच्या आर्थिक विकासात योगदान देण्यासाठी मॅग्ना कटिबद्ध आहे. आमच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यात हा प्रकल्प आम्हाला मदत करेल. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे उच्च-गुणवत्तेची उत्पादने आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी होऊ, असे ते म्हणाले.