Today’s Gold Silver Price  आयातशुल्क कमी केल्याने सोने- चांदीचे दर आटोक्यात आले होते, मात्र गणेशोत्सव काळात दर पुन्हा वाढताना दिसले. यात पुन्हा एकदा सोने- चांदीच्या दराने उच्चांकीच्या दिशेने वाटचाल केली आहे. आज सोने ७४ हजारांचा जवळपास गेले आहे, दररोजची ही दरवाढ पाहता चांदी देखील पुढे काही दिवसांनी लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात २ हजारांहून अधिकची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ७ हजारांची घसघशीत वाढ दिसून आली, त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी आता सोने-चांदी खरेदीचा विचार केला असेल तर आजचे दर नेमके काय आहेत जाणून घ्या.

आज १६ सप्टेंबर रोजी देशात आज सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७३,९६० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९०,०५० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात २००० ते २५०० रुपयांच्या दरम्यान वाढ झाली आहे तर तर चांदीचे दर जवळपास ७००० हजारांनी वाढे आहे.

17th November Latest Petrol Diesel Price
Petrol Diesel Price In Maharashtra : कुठे स्वस्त तर कुठे महाग, तुमच्या शहरांतील १ लिटर पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घ्या
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
Gold Silver Price Today 15 November 2024 in Marathi
Gold Price Today : फक्त १५ दिवसांमध्ये सोने ५००० रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा सोन्या-चांदीचा दर
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Gold Silver Price Today 12 November 2024 in Marathi
Gold Price Today : खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; खरेदीपूर्वी पाहा आजचा भाव
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 16 September 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७३,९६० रुपये आहे,तर २२ कॅरेटचे दर ६७,७९७ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८४६ रुपये आहे तर १ किलो चांदी ९०,०५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही ही दरवाढ दिसून आली आहे,

आदल्या दिवशीचा म्हणजे १५ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,८२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८३,४१० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १४० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी जवळपास ८७० नी महागली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,७४२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,९०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७४२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९०० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७४२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,७४२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,९०० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.