Maharashtra Government Public Holiday List 2025 : महाराष्ट्र सरकारने ४ डिसेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे २०२५ या वर्षासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत (Maharashtra Holiday List 2025) . १८८१ च्या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या कलम २५ द्वारे आधारित, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे वर्षभर विशिष्ट दिवशी सुट्ट्या देतात. महाराष्ट्रात फक्त बँकांना त्यांची वार्षिक खाती (Annual accounts) बंद करण्यासाठी मंगळवार, दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी सुट्टी असेल. पण, सरकारी कार्यालयांना या सुट्टीतून सूट देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र सरकारने २४ सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार) रोजी भाऊबीज, ही पुढील संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. त्यामध्ये
१. राज्यातील सरकारी कार्यालये
२. राज्यातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम
३. महानगरपालिका, नगरपरिषदा, नगर पंचायत, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती आदींचा समावेश आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्टयांची यादी पुढीलप्रमाणे (Maharashtra Holiday List 2025)

क्रमांकसुट्टीतारीखदिवस
१.प्रजासत्ताक दिन२६ जानेवारी २०२५ रविवार
२.छत्रपती शिवाजी महाराज जयंती१९ फेब्रुवारी २०२५ गुरुवार
३. महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ बुधवार
४. होळी (दुसरा दिवस) १४ मार्च २०२५ शुक्रवार
५.गुढीपाडवा ३० मार्च २०२५ रविवार
६.रमजान-ईद ३१ मार्च २०२५ सोमवार
७.राम नवमी६ एप्रिल २०२५ रविवार
८.महावीर जन्मकल्याणक १० एप्रिल २०२५ गुरुवार
९.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल २०२५ सोमवार
१०.गुड फ्रायडे १८ एप्रिल २०२५ शुक्रवार
११.महाराष्ट्र दिन १ मे २०२५ गुरुवार
१२.बुद्ध पौर्णिमा १२ मे २०२५ सोमवार
१३.बकरी ईद ७ जून २०२५ शनिवार
१४.मोहरम ६ जुलै २०२५ रविवार
१५.स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०५ शुक्रवार
१६.पारसी नववर्ष १५ ऑगस्ट २०२५ शुक्रवार
१७.गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट २०२५ बुधवार
१८.ईद-ए-मिलाद५ सप्टेंबर २०२५ शुक्रवार
१९.महात्मा गांधी जयंती २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार
२०.दसरा २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार
२१.दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन ) २१ ऑक्टोबर २०२५ मंगळवार
२२.दिवाळी (बलिप्रतिपदा) २२ ऑक्टोबर २०२५ बुधवार
२३.गुरु नानक जयंती ५ नोव्हेंबर २०२५ बुधवार
२४.ख्रिसमस२५ डिसेंबर २०२५बुधवार

हेही वाचा…India 2025 Astrology Predictions: भारतासाठी २०२५ हे वर्ष कसे असणार? चढाओढ-स्पर्धा ते सोन्या-चांदीचा वाढत राहणारा भाव… वाचा उल्हास गुप्तेंचा अंदाज

नवीन वर्षाचे कॅलेंडर आले की सगळ्यात पहिला आपण गणेशोत्सव, आपला वाढदिवस, त्याचबरोबर रविवारी कोणता सण आला नाही ना हे सगळ्यात पहिल्यांदा पाहून घेतो. तर यंदा २०२५ मध्ये गुढी पाडवा, रामनवमी, मोहरम आणि प्रजासत्ताक दिन यांसारखे सण रविवारी येणार आहेत. तर ही होती महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली सुट्ट्यांची यादी (Maharashtra Holiday List 2025)…

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra public holidays 2025 check maharashtra state government holiday list given below chart asp