मुंबई : वस्तू आणि सेवा कर संकलनात (जीएसटी) महाराष्ट्राने अव्वल स्थान कायम राखले आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनाचा उच्चांक गाठला असून पहिल्यांदाच ३ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सरलेल्या आर्थिक वर्षात ३.२ लाख कोटी जीएसटी संकलन झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

हेही वाचा >>> कॅनरा बँकेकडून ‘समभाग विभागणी’ पात्रतेसाठी १५ मे रेकॉर्ड तारीख घोषित

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharshtra electoral history
महाराष्ट्राची निर्मिती, काँग्रेसचे वर्चस्व, हिंदुत्वाचा उदय; महाराष्ट्र निवडणुकीचा इतिहास काय सांगतो?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
State Bank quarterly profit of Rs 18331 crore
स्टेट बँकेला १८,३३१ कोटींचा तिमाही नफा

महाराष्ट्र राज्याच्या देशातील एकूण वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के राहिला आहे. गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्क्याची वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे. ही राज्यातील उद्योग, व्यापार यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. राज्यातील आर्थिक व्यवहारातील गतिमानता तसेच वस्तू व सेवा कर विभागाद्वारे महसुल वृद्धीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे कर संकलनाचा चढता आलेख टिकवून ठेवणे शक्य झाले आहे, अशी माहिती महाराष्ट्राच्या वस्तू व सेवा कर विभागाने दिली.

हेही वाचा >>> तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड

राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास जीएसटीतून १,४१,७०० कोटी एवढा उच्चांकी महसूल प्राप्त झाला आहे. राज्य व सेवाकराच्या माध्यमातून (एसजीएसटी) ९३,४०० कोटी तर एकात्मिक कराच्या माध्यमातून ४८,३०० कोटींचा महसूल तिजोरीत जमा झाला. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवर्धित कराचा महसूल ५३,२०० कोटी राहिला आहे. वस्तू व सेवा कर, मुल्यवर्धित कर, व्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के नोंदवला आहे.