महारेराने ५ वर्षांपूर्वी मे २०१७ ला स्थापनेच्या वेळी तयार केलेल्या संकेतस्थळात काळसुसंगत आमूलाग्र बदल करायला सुरुवात केलेली आहे. नवीन संकेतस्थळ महारेराक्रिटी म्हणजे तक्रार आणि विनियामक एकात्मिक तंत्रज्ञान अंमलबजावणी ( Complaint and Regulatory Integrated Technology Implementation- CRITI) अशा नावाने ओळखले जाणार आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे संकेतस्थळ पूर्णतः सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तांत्रिक बाब म्हणून सध्याचे संकेतस्थळ त्या काळात काही दिवसांसाठी स्थगित ठेवावे लागणार आहे.

हेही वाचाः यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये मानक वजावटीची मर्यादा वाढवली जाणार का? अर्थमंत्र्यांकडून अधिक सवलतीची अपेक्षा

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Anil Ambani Company Banned
Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा धक्का; रिलायन्सच्या कंपनीवर तीन वर्षांसाठी बंदी, शेअर गडगडले
Tulsi Vivah 204 Date Time Puja Vidhi Shubh Muhurat in Marathi
Tulsi Vivah 2024 Date Time: १२ की १३, तुळशी विवाह नक्की कधी? जाणून घ्या योग्य तारीख, तिथी आणि शुभ मुहूर्त
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : शुक्र करणार धनु राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, मिळेल प्रत्येक कामात यश
navi mumbai airport naming movement will be intensified After election says Naming Committee President Dashrath Patil
निवडणुकीनंतर विमानतळ नामकरण आंदोलन तीव्र, नामकरण समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांची माहिती
ranbir kapoor ramayana poster out
ठरलं! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार रणबीर कपूरचा बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट, निर्मात्यांनी जाहीर केला मोठा ट्विस्ट
west pune vs east pune dispute over progress
‘पूर्व’ आणि ‘पश्चिम’ पुण्याचा वाद जुनाच

हे संकेतस्थळ वापरकर्तास्नेही ( User friendly) राहणार आहे. ग्राहकांना उपयुक्त ठरतील, असे अनेक घटक यात राहणार आहेत. यात विशेषत्वाने ग्राहकांना तक्रारी नोंदवणे अधिक सोपे व्हावे, यासाठी विशेष काळजी घेण्यात आलेली आहे. शिवाय सध्याच्या प्रकल्पाची ग्राहकांना सहजपणे माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी संक्षिप्त रूपात प्रकल्पस्थिती (Project Health Summary) ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती संकेतस्थळावर असणार आहे. ज्यामुळे घर खरेदीदारांना गुंतवणूक केलेली असल्यास किंवा करायची असल्यास त्या प्रकल्पाची सद्यस्थिती सहजपणे उपलब्ध होणार आहे.

हेही वाचाः भारतीय रेल्वेने ‘या’ ९ महिन्यांत आतापर्यंतचा सर्वाधिक भांडवली खर्चाचा केला वापर

यात विकासकांसाठीही अनेक घटक आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे विकासकांना सध्या प्रपत्र १, २ आणि ३ तिमाही आणि प्रपत्र ५ वर्षाला सादर करावे लागते. अनेक पानांचा दस्तावेज असतो. हे संकेतस्थळ कार्यान्वित झाल्यानंतर ही माहिती सहजपणे भरण्याची सोय करण्यात आलेली आहे. या नवीन संकेतस्थळामुळे एकूण स्थावर संपदा क्षेत्रात पारदर्शक ( Transparency), दायित्व ( Accountability) आणि कार्यक्षमता ( Efficiency) वाढीस लागायला मदत व्हावी, असा महारेराचा प्रयत्न राहणार आहे.