महारेराने ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केल्यानुसार दोष दायित्व कालावधीच्या मदतीने बांधकामात राहिलेल्या त्रुटी दूर करण्याची गरज भासू नये , असा स्थावर संपदा क्षेत्रातील बांधकामांबाबत गुणवत्ता आश्वासन अहवालाचा आराखडा विकसित करण्यासाठी ( Framework for Quality Assurance Reporting)सल्लामसलत पेपर जाहीर केला आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत जनतेकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. महारेराने विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांना १३ ऑक्टोबरला याबाबत पत्र लिहून ३१ ऑक्टोबरपर्यंत सूचना पाठविण्याची विनंती केलेली होती . परंतु त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. महारेराने या क्षेत्रातील तज्ज्ञ, जागतिक पातळीवरील उत्तमोत्तम पद्धती व प्रधानमंत्री आवास योजनेतील याबाबतच्या तरतुदी या अनुषंगाने करण्यात आलेल्या चर्चांच्या आधारे हा सल्लामसलत पेपर तयार केलेला आहे. जनतेने ३१ डिसेंबरपर्यंत suggestions.maharera@gmail.com या ईमेलवर या अनुषंगाने त्यांचा सूचना पाठवाव्या, असे आवाहन महारेराने केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा