Mahindra & Mahindra plan of 5 thousand crores : देशातील सर्वात मोठी स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ही ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट आणि इतर जागतिक गुंतवणूकदारांबरोबर तिच्या इलेक्ट्रिक वाहन युनिटसाठी ५,००० कोटी रुपये म्हणजेच ६०५ दशलक्ष डॉलर उभे करण्यासाठी चर्चा करीत आहे. जर महिंद्रा अँड महिंद्राची ईव्ही युनिटसाठी गुंतवणकीची चर्चा यशस्वी झाली, तर ब्रिटिश आंतरराष्ट्रीय गुंतवणूक (British International Investment) यंदा दुसऱ्यांदा भारतीय समूहात गुंतवणूक करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करार मूल्यमापन (deal valuation) मागील फंडिंग फेरीच्या तुलनेत १०-१५ टक्क्यांनी जास्त असण्याची शक्यता आहे.

अद्यापही बँकर नियुक्त नाही

विशेष म्हणजे ब्रिटिश आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीने ( BII) यापूर्वी जुलै २०२२ मध्ये अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य शेअर्सद्वारे १,९२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिकबरोबर करार केला होता. ज्यात कंपनीमध्ये २.७५-४.७६ टक्के हिस्सेदारी असेल. हीच रक्कम महिंद्रा इक्विटीद्वारे गुंतवणार होती. आम्ही निधी उभारण्यासाठी कोणत्याही बँकरची नियुक्ती केलेली नसली तरी आमच्या ईव्ही व्यवसायातील गुंतवणूकदारांचे हित स्पष्टपणे दिसत आहे, असंही महिंद्राच्या प्रवक्त्याने मीडिया रिपोर्टला दिलेल्या ईमेलच्या उत्तरात म्हटले आहे. तर दुसरीकडे ब्रिटिश आंतरराष्ट्रीय गुंतवणूक कंपनीने ( BII)ने कोणतेही विधान केलेले नाही.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
mega block on central and western line for repair of railway tracks and signals system
Mumbai Local Train Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
Dnyanradha Multi State Co Operative Credit Society, fraud case, ED
ईडीकडून ३३३ कोटींच्या मालमत्तेवर टाच
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

महिंद्राची नेमकी योजना काय?

वाढत्या स्थानिक स्पर्धेदरम्यान महिंद्राने आपल्या EV गाड्यांसाठी निधी उभारणीची दुसरी फेरी सुरू केली आहे. भारतातील ऑटो कंपन्या उत्पादनांच्या लाँचला गती देण्यासाठी आणि डीकार्बोनायझेशन लक्ष्य पूर्ण करण्यासाठी EV विभागातील क्षमता वाढवण्यासाठी बाहेरील निधी शोधत आहेत. महिंद्राने आर्थिक वर्ष २०२२ ते आर्थिक वर्ष २०२७ दरम्यान त्यांच्या EV उपकंपन्यांमध्ये सुमारे १०,००० कोटी रुपयांची भांडवली खर्चाची योजना तयार केली आहे. यापैकी ४,००० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२ ते आर्थिक वर्ष २०२४ दरम्यान आणि उर्वरित आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत गुंतवले जातील, असंही कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या खुलाशात म्हटले आहे.

हेही वाचाः सर्वाधिक पगाराचे पॅकेज देण्यात महाराष्ट्रातील ‘या’ शहराने दिल्ली, मुंबई, बंगळुरूलाही टाकले मागे

महिंद्राने आतापर्यंत किती गाड्या विकल्या?

महिंद्राची एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान पाच नवीन EV मॉडेल लॉन्च करण्याची योजना आहे. ई-SUV चा प्रवेश त्याच्या एकूण SUV पोर्टफोलिओच्या २०-३० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, जे सुमारे २००,००० युनिट्सपर्यंत पोहोचते, अशीही कार निर्मात्याला अपेक्षा आहे. मेपर्यंत महिंद्रा अँड महिंद्राने XUV ४०० च्या ३,६९० युनिट्सची विक्री केली आहे. ई-SUV या जानेवारीत लॉन्च झाली आहे, जी या कालावधीत विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांच्या सुमारे २.२ टक्के होती.

हेही वाचाः अदाणी समूहाने ‘या’ तीन कंपन्यांमधील भागीदारी विकली, जमवले ११,३३० कोटी रुपये