महिंद्रा अँड महिंद्राने खासगी क्षेत्रात एक मोठा उपक्रम सुरू केला आहे. खासगी क्षेत्रातील या कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी नवीन मातृत्व धोरण आणले आहे. ही पाच वर्षांची पॉलिसी सादर करण्यात आली असून, ज्यामध्ये पाच वर्षांचे करिअर आणि काळजी योजना (care plan) आणण्यात आली आहे, ज्यामध्ये सक्तीच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. महिंद्रा अँड महिंद्राशी संबंधित सर्व महिला कामगारांसाठी ही सुविधा उपलब्ध असेल. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही प्रसूती धोरणांतर्गत समाविष्ट केले जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्तक आणि सरोगसी महिलांनाही या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाणार आहे आणि त्यांना प्रसूती रजा देखील मिळणार आहे. भारतीय समूह महिंद्रा अँड महिंद्राने सरोगसी आणि गर्भावस्थेत असलेल्या महिलांचा समावेश करण्यासाठी आपल्या पाच वर्षांच्या मातृत्व पॉलिसीचा विस्तार केला आहे, असे महिंद्रा अँड महिंद्रा समूहाच्या वरिष्ठ अधिकारी रुजाबेह इराणी यांनी सांगितले आहे.

हेही वाचाः खऱ्या आयुष्यातील ‘बॉस’! कर्मचार्‍यांचा पगार वाढवण्यासाठी चक्क स्वतःचा पगार केला कमी, कोण आहेत सतीश मल्होत्रा?

पाच वर्षांच्या मातृत्व धोरणात काय आहे?

नवीन मॅटर्निटी बेनिफिट पॉलिसीमध्ये मॅनेजरच्या मान्यतेने ६ महिने फ्लेक्सी वर्क पर्याय आणि २४ महिन्यांच्या हायब्रीड कामाचा पर्याय उपलब्ध आहे. याबरोबरच एका आठवड्याची सक्तीची प्रसूती रजाही दिली जाणार आहे. इराणी म्हणाल्या की, आम्ही एक नियमावली तयार केली आहे, ज्यामध्ये पाच वर्षांचा प्रवास समाविष्ट आहे. यामध्ये प्रसूतीपूर्वी एक वर्ष आणि आई झाल्यानंतर एक वर्ष, नंतर तीन वर्षांचा समावेश असेल.

हेही वाचाः ईपीएफओने दिला अलर्ट! बनावट कॉल आणि एसएमएसपासून राहा सावध, अशी करा तक्रार

ही पॉलिसी अधिकाधिक महिलांना आकर्षित करणार

मुख्य ब्रँड ऑफिसर आशा खर्गा म्हणाल्या की, एक उद्योग म्हणून आम्ही अधिकाधिक महिलांना आकर्षित करण्याचा विचार करीत आहोत आणि आमची नवीन मातृत्व पॉलिसी हा यातील महत्त्वाचा पैलू आहे. या पॉलिसीचा उद्देश या पाच वर्षांमध्ये महिलांना पूर्ण पाठिंबा देणे हा आहे.

पंचवार्षिक पॉलिसी अंतर्गत लाभ

हा नियम ‘अधिकारी दर्जाच्या’ महिला कर्मचार्‍यांना लागू असून, पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रात महिलांची प्रतिभा टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. याशिवाय पॉलिसी IVF उपचार खर्चावर ७५ टक्के सवलत, दैनंदिन वाहतूक सुविधा आणि गर्भधारणेच्या शेवटच्या तिमाहीत प्रीमियम इकॉनॉमी किंवा बिझनेस क्लासमध्ये प्रवासासह एक वर्ष प्रसूतीपूर्व पाठिंबासुद्धा देते.

सुट्टी किती दिवस मिळणार?

मुलाच्या देखभालीसाठी रजा घेऊ इच्छिणाऱ्या किंवा आराम करू इच्छिणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंपनी एका वर्षाच्या कालावधीसाठी पगाराशिवाय रजेचा पर्यायही उपलब्ध करून देणार आहे. परंतु हे त्यांच्यासाठी आहे, ज्यांनी संस्थेत ३६ महिने सेवा पूर्ण केलेली आहे. कंपनी प्रसूती रजेवरून परतणाऱ्या महिलांसाठी करिअर अॅश्युरन्स पॉलिसीदेखील देत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra mahindra special initiative for women will get five years of maternity leave vrd
Show comments