चीन सरकारच्या आदेशामुळे अॅपलला मोठा धक्का बसू शकतो. चिनी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अॅपलचे आयफोन आणि परदेशी कंपन्यांचे उपकरण अधिकृत कामासाठी वापरू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. Apple iPhone ची नवीन सीरिज लॉन्च होण्याच्या एक आठवडा आधीच हा आदेश आल्यानं चीनमध्ये खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनच्या सरकारने आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अधिकृत कामासाठी Apple iPhones किंवा इतर परदेशी कंपन्यांचे उपकरण वापरू नयेत, असे आदेश दिले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने या प्रकरणाशी संबंधितांना हवाला देत बुधवारी हे वृत्त दिले. अलिकडच्या आठवड्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना Apple iPhones आणि परदेशी कंपन्यांची उपकरणे कामासाठी वापरू नयेत, असे आदेश दिले होते.

हेही वाचाः Money Mantra : गृहकर्ज निवडण्याचा योग्य मार्ग कोणता? व्याजदरावर कसा परिणाम होतो? संपूर्ण गणित समजून घ्या

पुढील आठवड्यात होणाऱ्या अॅपल इव्हेंटपूर्वी हे निर्बंध लादण्यात आले आहेत. या इव्हेंटमध्ये आयफोनची पुढील सीरिज लाँच होणार आहे. याशिवाय चीन आणि अमेरिकेतील वाढत्या तणावामुळे चीनमध्ये काम करणाऱ्या विदेशी कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा तणाव लक्षात घेऊन अॅपलने भारतात उत्पादन वाढवले ​​आहे. हळूहळू अॅपल चीनसोबत स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच चीनने असा निर्णय घेतला आहे. हे आदेश काही कर्मचाऱ्यांनाच देण्यात आले आहेत की, संपूर्ण शासकीय यंत्रणेत फिरविण्यात आले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचाः Money Mantra : पत्नीच्या नावावर सोने खरेदी करून कर बचत करता येते का? नियम काय सांगतो?

डेटा सुरक्षेबाबत चीन चिंतेत

चीन अलिकडच्या वर्षांत डेटा सुरक्षिततेबद्दल अधिक चिंतीत झाला आहे. कंपन्यांसाठी नवीन कायदे लागू केले आहेत. मे महिन्यात चीनने मोठ्या सरकारी मालकीच्या उद्योगांना (SOEs) तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवण्याच्या त्यांच्या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले. चीन-अमेरिका तणाव या क्षणी उच्च आहे, कारण वॉशिंग्टन त्याच्या चिप उद्योगाला स्पर्धात्मक ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण उपकरणांपर्यंत चीनचा प्रवेश रोखण्यासाठी सहयोगी देशांसोबत काम करीत आहे. दुसरीकडे बीजिंग विमान निर्माता कंपनी बोईंग आणि चिप कंपनी मायक्रॉन टेक्नॉलॉजीसह मोठ्या अमेरिकन कंपन्यांच्या शिपमेंटवर निर्बंध घालत आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major order by the chinese government bans government employees and agencies from using iphones vrd