मुंबई : औषधी निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या मॅनकाइंड फार्माची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुढील तीन दिवस म्हणजे २७ एप्रिलपर्यंत गुंतवणूकदारांना या समभाग विक्रीत सहभागी होता येईल. तर सुकाणू गुंतवणूकदारांना २४ एप्रिल रोजी समभाग खरेदीसाठी अर्ज करता येईल.

पुढील महिन्यात ९ मे रोजी कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) सूचिबद्ध केले जाणे अपेक्षित आहे. कंपनीने समभाग विक्रीसाठी १०२६ रुपये ते १०८० रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे.

IIT Mumbai to redesign Thane transport plan thane news
मुंबई आयआयटी करणार ठाण्याच्या वाहतुक आराखड्याची फेरआखणी; पुढील पाच वर्षांतील वाहतूक आव्हानांचा होणार अभ्यास
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारक त्यांच्या हिस्सेदारीतील आंशिक वाटा असे सुमारे ४ कोटी समभागांची यातून विक्री करणार आहेत. कंपनीचे प्रवर्तक रमेश जुनेजा, राजीव जुनेजा आणि शीतल अरोरा यांच्या मालकीचे अनुक्रमे ३७ लाख, ३५ लाख आणि २८ लाख समभाग विकले जाणार आहेत. शिवाय, केर्नहिल सीआयपीईएफ, केर्नहिल सीजीपीई, बेज लिमिटेड आणि लिंक इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट हे विद्यमान भागधारकदेखील त्यांचे समभाग विकत आहेत. समभाग विक्रीतून मिळणारा निधी हा पूर्णपणे कंपनीचे प्रवर्तक आणि विद्यमान भागधारकांना मिळणार आहे.

मॅनकाइंड फार्मा ही मुख्यतः ग्राहक आरोग्य सेवा उत्पादनांशी निगडित विविध श्रेणींतील फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन विकसित करून, त्याचे उत्पादन आणि विपणनांत गुंतलेली आहे. शिवाय कंडोम, गर्भधारणा ओळखण्यासाठी किट, आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या, अँटासिड पावडर, जीवनसत्त्व आणि खनिज पूरक औषधे ती तयार करते. देशभरात २५ ठिकाणी तिचे उत्पादन प्रकल्प कार्यरत आहेत. डिसेंबर २०२२ पर्यंत, कंपनीकडे ६०० हून अधिक शास्त्रज्ञ काम करतात. शिवाय कंपनीची मानेसर, गुरुग्राम (हरियाणा) आणि ठाणे (महाराष्ट्र) येथे विकास आणि संशोधन केंद्रदेखील आहेत.

Story img Loader