नवी दिल्ली : देशातील उत्पादन क्षेत्राच्या सक्रियतेचा वेग सरलेल्या जानेवारीमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी पातळीवर गेल्याचे मासिक सर्वेक्षणातून सोमवारी पुढे आलेल्या आकड्यांनी स्पष्ट केले. कंपन्यांच्या निर्यात कार्यादेशांमध्ये गेल्या १४ वर्षांतील सर्वाधिक वाढ झाल्याने हे घडले.

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी जाणून घेण्यासाठी या क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणाऱ्या ‘एचएसबीसी इंडिया’च्या सर्वेक्षणावर आधारित पीएमआय निर्देशांकाची जानेवारीमधील ५७.७ गुणांची पातळी ही देशाच्या कारखानदारीची गती महिनागणिक वाढल्याचे द्योतक आहे. हा या निर्देशांकाचा गेल्या सहा महिन्यांतील उच्चांक आहे. आधीच्या डिसेंबर महिन्यात हा निर्देशांक ५६.४ गुणांवर होता. निर्देशांक ५० गुणांच्या वर असल्यास विस्तारपूरक आणि ५० गुणांच्या खाली असल्यास आकुंचनाचे निदर्शक असतो.

builders January
वर्षाची सुरुवात बांधकाम व्यावसायिकांसाठी सकारात्मक, मागील १३ वर्षांतील जानेवारीमधील घरविक्रीचा उच्चांक
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
Companies urged to pay better salaries 53 percent of highly educated graduates protest
चांगले वेतन देण्याचे कंपन्यांना आर्जव; उच्चशिक्षित ५३ टक्के पदवीधरांची बोळवण
Job Opportunities in Agriculture Sector Agri Food Technology Sector Production Capacity
मातीतलं करिअर: कृषी अन्नतंत्रज्ञान क्षेत्र
abscond criminal detained under mpda act
‘एमपीडीए’ कारवाईनंतर फरारी झालेल्या गुंडाला अटक; कारवाई टाळण्यासाठी डोंगरात वास्तव्य
diamond imprest authorisation
केंद्र सरकारची हिरे निर्यातीला चालना देण्यासाठी विशेष योजना
Edible oil imports increase by 16 percent What was the impact of the increase in palm oil prices Mumbai print news
खाद्यतेलाच्या आयातीत १६ टक्क्यांनी वाढ; जाणून घ्या, पामतेलाच्या दरवाढीचा परिणाम काय झाला

निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनी देशांतर्गत नवीन कार्यादेशांमध्ये लक्षणीय वाढ नोंदविली असून, त्यांच्या आंतरराष्ट्रीय विक्रीतही वाढ झाली आहे. कंपन्यांकडून उत्पादन क्षमता वाढविण्यात येत आहे. हा क्षमता विस्ताराचा वेग ऑक्टोबर २०२४ पासून सर्वाधिक ठरला आहे. याचबरोबर आगामी काळातील उत्पादनाबाबत कंपन्या आशावादी आहेत. सुमारे ३२ टक्के कंपन्यांनी वाढीचा आणि १ टक्का कंपन्यांनी घसरणीचा अंदाज सर्वेक्षणात वर्तविला आहे. गेल्या काही महिन्यांत झालेल्या मनुष्यबळ भरतीमुळे कंपन्यांना उत्पादनात वाढ शक्य झाल्याचेही सर्वेक्षणात नमूद केले आहे.

निर्यात ऑर्डरमध्ये १४ वर्षांतील सर्वाधिक वाढ

भारताच्या निर्मिती क्षेत्राने जानेवारीमध्ये सहा महिन्यांतील उच्चांकी कामगिरी नोंदविली. देशांतर्गत आणि निर्यातीच्या कार्यादेशात वाढ झाली असून, नवीन कार्यादेशातील वाढीला लक्षणीय गती मिळाल्याचे दिसत आहे. – प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी

Story img Loader