पीटीआय, नवी दिल्ली

नवीन कार्यादेश आणि आंतरराष्ट्रीय विक्रीमध्ये वेगाने वाढ झाल्यामुळे भारताच्या उत्पादन क्षेत्राची कामगिरी सप्टेंबरमध्ये नोंदवलेल्या आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवरून ५७.५ गुणांपर्यंत ऑक्टोबरमध्ये सावरली, असे मासिक सर्वेक्षणाने सोमवारी स्पष्ट केले

SAR Televenture takes over Tikona for Rs 669 crores print eco news
‘एसएआर टेलीव्हेंचर’चा ६६९ कोटींच्या मोबदल्यात ‘तिकोना’वर ताबा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Acme Solar initial unit sale at Rs 275 to Rs 289 each
ॲक्मे सोलरची प्रत्येकी २७५ ते २८९ रुपयांना प्रारंभिक भागविक्री; निवा बुपा ‘आयपीओ’द्वारे २,२०० कोटी उभारणार!
Loksatta editorial about investment decline in Maharashtra
अग्रलेख: महाराष्ट्र मंदावू लागला…
candidate post for new Deputy Governor post of Reserve Bank
रिझर्व्ह बँकेच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पदासाठी उमेदवाराचा शोध; मायकल देबब्रत पात्रा यांना मुदतवाढ मिळणार नसल्याचे स्पष्ट
Rupee lowers as foreign investment returns to capital markets
रुपयाचा सार्वकालिक नीचांक; एक डॉलर आता ८४.११ रुपयांना
Exports of the country crossed the mark of 800 billion dollars
देशाची निर्यात ८०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडेल!
CJI Chandrachud
CJI Chandrachud : “सरकारविरोधात निकाल देणं म्हणजे…”, न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याविषयी सरन्यायाधीशांचं परखड मत

एचएसबीसी इंडियाने खासगी कंपन्यांच्या खरेदी व्यवस्थापकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित ‘पीएमआय निर्देशांक’ ऑक्टोबरमध्ये ५७.५ गुणांपर्यंत वाढला. निर्देशांकातील ही वाढ कार्यात्मक परिस्थितीत लक्षणीय आणि वेगवान सुधारणा दर्शविते. विशेषत: सप्टेंबरमधील ५६.५ गुणांच्या आठ महिन्यांच्या नीचांकी स्तरावरून त्याने १०० आधारबिंदूंनी वाढ दाखविली आहे. तथापि पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर नोंदवला जाणे हे विस्तारपूरक, तर तो ५० गुणांपेक्षा कमी नोंद होणे परिस्थिती नकारात्मक बनल्याचे दर्शविते.

हेही वाचा >>>सेन्सेक्सची मोठी आपटी! निफ्टी २४ हजारांखाली, अमेरिकेतील राजकीय अनिश्चिततेचा परिणाम

भारतीय वस्तूंच्या मजबूत मागणीमुळे एकंदर उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीत वाढ झाली. शिवाय, सणासुदीच्या हंगामात नवीन उत्पादनांची प्रस्तुती आणि यशस्वी विपणन उपक्रमांमुळे विक्री कामगिरी वाढण्यास मदत झाल्याचा हा सुपरिणाम आहे. सप्टेंबरमध्ये दिसलेल्या कमकुवतपणानंतर, नवीन निर्यात कार्यादेशांमध्येही मजबूत वाढ दिसून आली. आशिया, युरोप, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेमधील नवीन निर्यात करार कंपन्यांनी मिळविले.

किमतींच्या आघाडीवर, भारतातील उत्पादन क्षेत्रावर महागाईचा दबाव वाढल्याचे सरलेल्या ऑक्टोबरने संकेत दिले आहेत. कच्च्या मालाच्या किमती आणि विक्री शुल्क दोन्ही मजबूत फरकाने वाढले. वाढत्या उत्पादन खर्चामुळे वस्तू उत्पादकांनी अतिरिक्त कर्मचारी घेण्यास या महिन्यांत अनुत्सुक दिसून आल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले.

ऑक्टोबरमध्ये उत्पादन क्षेत्राच्या सक्रियतेतील लक्षणीय वाढ ही एकंदर अर्थव्यवस्थेतील चांगल्या सुधारणांचा परिणाम आहे. नवीन कार्यादेशांतील वेगाने वाढ आणि आंतरराष्ट्रीय विक्री ही उत्पादन क्षेत्रासाठी मजबूत मागणीला पूरक ठरली.- प्रांजुल भंडारी, मुख्य अर्थतज्ज्ञ, एचएसबीसी इंडिया

Story img Loader