वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

कृत्रिम प्रज्ञेमुळे (आर्टिफिशियल इंटेलिजन्स – एआय) अनेक प्रकारच्या नोकऱ्या नामशेष होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच आता तंत्रज्ञान क्षेत्रातील इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स अर्थात आयबीएम कॉर्पोरेशनने याची सुस्पष्ट कबुली देताना, भविष्यात कंपनीतील ७,८०० कर्मचाऱ्यांची जागा ‘एआय’कडून घेतली जाईल, असे नमूद केले आहे आणि त्याची तयारी म्हणून नवीन भरतीही स्थगित केली आहे. याबाबत आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद कृष्णा म्हणाले की, ग्राहककेंद्रित नसलेल्या मनुष्यबळासह इतर विभागांच्या नवीन भरतीला स्थगिती मिळणे अपेक्षित आहे. पुढील पाच वर्षांत या विभागांतील ३० टक्के कर्मचाऱ्यांची जागा ‘एआय’ घेईल. आगामी काही वर्षांत ७,८०० कर्मचाऱ्यांची जागा ‘एआय’ घेईल. या कर्मचारी कपातीमध्ये सध्या कमी करण्यात आलेल्या मनुष्यबळाचा समावेश नसेल.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
loksatta kutuhal artificial intelligence and research in mathematics
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गणितातील संशोधन
loksatta kutuhal artificial intelligence for good governance
कुतूहल : उत्तम प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती
loksatta kutuhal artificial intelligence for scientific data analysis
कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Demonstrations by artists
कला अकादमी आणि नूतनीकरणाची मोगलाई
fraud of One lakh with CME professor in the name of courier
कुरिअरच्या नावाखाली सीएमईच्या प्राध्यापकाची एक लाखांची फसवणूक

आयबीएममध्ये सध्या २ लाख ६० हजार इतके मनुष्यबळ कार्यरत आहे. संगणक प्रणाली विकास आणि ग्राहककेंद्रित विभागांमध्ये कंपनीकडून नवीन भरती सुरू राहणार आहे. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला ५,००० कर्मचाऱ्यांची कपात केली गेली. यंदा पहिल्या तिमाहीत कंपनीने तुलनेने कमी म्हणजे ७,००० कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.

रोजगार कपातीची ओरड

मायक्रोसॉफ्टच्या पाठिंब्याने ‘ओपन एआय’चे चॅटबॉट आणि चॅटजीपीटी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झाले. जगभरात सध्या कृत्रिम प्रज्ञेबाबत मोठी चर्चा सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात कुतूहल जागवले गेले आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे रोजगारात मोठी कपात होईल, अशीही ओरड सुरू आहे. आता आयबीएमनेच याबाबत पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.