मार्च महिना सुरू होताच, दर महिन्याप्रमाणे या महिन्याच्या सुरुवातीला अनेक आर्थिक नियमांत बद झाले आहेत. १ मार्चपासून असे अनेक नवीन नियम लागू झाले आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, या बदलांबद्दल माहिती असने प्रत्येकासाठी महत्वाचे आहे, कारण याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होऊ शकतो.

UPI द्वारे विमा प्रीमियम भरणे झाले सोपे

१ मार्च २०२५ पासून, युनिफाइड पेमेंट इंटरफेस व्यवहारांमध्ये मोठा बदल झाला आहे. IRDAI च्या नवीन नियमांनुसार, आता UPI द्वारे विमा प्रीमियम भरणे आणखी सोपे झाले आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) UPI द्वारे विमा-ASBA (एप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाउंट) नावाची एक नवीन सुविधा सुरू केली आहे.

म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्याला करता येणार १० वारसांची नोंद

१ मार्चपासून, गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आणि डीमॅट खात्यात जास्तीत जास्त १० वारसांची नोंदणी करता येणार आहे. सध्या, एक किंवा दोन नामांकित व्यक्तींची म्हणून नोंद करण्याची सुविधा आहे. १० जानेवारी रोजी सेबीने या बदलाबाबत एक परिपत्रक जारी केले होते आणि हा बदल १ मार्चपासून लागू केला जाईल असे सांगितले होते.

युनिव्हर्सल अकाउंट नंबर एक्टिव्ह करण्याची मुदत

EPFO ​​सदस्य असलेल्यांना आणि ELI योजनेचे फायदे घेऊ इच्छित असणाऱ्यांना UAN एक्टिव्हेट करण्याची मुदत १५ मार्चपर्यंत देण्यात आली आहे. याचबरोबर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने युनिव्हर्सल अकाउंट नंबर एक्टिव्हेट करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी जोडण्यासाठीची अंतिम मुदतही १५ मार्चपर्यंत वाढवली आहे.

एटीएफ किमती

१ मार्चपासून एटीएफच्या किमतींमध्येही बदल झाला आहे, ज्याचा थेट परिणाम हवाई प्रवासावर होईल. जर एटीएफ महाग झाला तर विमान कंपन्या तिकिटांच्या किमती वाढवतात आणि जर ते स्वस्त झाले तर भाड्यात सवलत देतात. दर महिन्याच्या पहिल्या दिवशी, तेल वितरण कंपन्या नवीन एटीएफ दर जाहीर करतात.
जेट इंधन किंवा विमान इंधन (एटीएफ) च्या किमती ०.२३ टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत. मार्च २०२५ साठी दिल्लीत एटीएफची किंमत २२२ रुपये प्रति किलोलिटरने कमी करून ९५,३११.७२ रुपये प्रति किलोलिटर करण्यात आली आहे, जी पूर्वी ९५,५३३.७२ रुपये होती.

Story img Loader