मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समधील आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या बाजारभांडवलात सरलेल्या आठवड्यात ८४,५५९.०१ कोटी रुपयांची भर पडली आहे. यामध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरच्या बाजारभांडवलात सर्वाधिक वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, सेन्सेक्स २०७.४३ अंकांनी घसरला तर निफ्टीने ७५.९ अंश गमावले.

रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स आणि आयटीसी यांच्या बाजारभांडवलात वाढ झाली, तर एचडीएफसी बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक आणि इन्फोसिसचे बाजारभांडवल घटले. हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजारमूल्य २८,७००.२६ कोटी रुपयांनी वाढून ५,५६,०५४.२७ कोटी रुपयांवर पोहोचले. रिलायन्स इंडस्ट्रीजने १९,७५७.२७ कोटी रुपयांची भर घातली, ज्यामुळे तिचे बाजारमूल्य १६,५०,००२.२३ कोटी रुपयांवर पोहोचले.

आयटीसीचे भांडवल १५,३२९.७९ कोटी रुपयांनी वाढून ५,२७,८४५.५७ कोटी रुपयांवर पोहोचले आणि बजाज फायनान्सचे मूल्यांकन १२,७६०.२३ कोटी रुपयांनी वाढून ५,५३,३४८.२८ कोटी रुपयांवर पोहोचले. त्यापाठोपाठ भारती एअरटेलचे बाजारमूल्य ८,०११.४६ कोटी रुपयांनी वाढून १०,०२,०३०.९७ कोटी रुपयांवर पोहोचले. मात्र टीसीएसचे मूल्यांकन २४,२९५.४६ कोटी रुपयांनी घसरून ११,६९,४७४.४३ कोटी रुपयांवर पोहोचले. इन्फोसिसचे बाजारमूल्य १७,३१९.११ कोटी रुपयांनी घसरून ५,८५,८५९.३४ कोटी रुपयांवर आले. तर स्टेट बँकेचे मूल्य १२,२७१.३६ कोटी रुपयांनी घसरून ६,७२,९६०.९७ कोटी रुपयांवर आले.