मुंबई : देशांतर्गत घडामोडींसह आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिकूल घटना आणि मंदीच्या सावटाने भांडवली बाजाराला ग्रासले आहे. २७ सप्टेंबरच्या निफ्टी आणि सेन्सेक्सचे अनुक्रमे २६,२७७.३५ आणि ८५,९७८.२५ अंशांचे इतिहासातील सर्वोच्च शिखर ते इतिहासातील सर्वांत तीव्र घसरणीचे चटके गुंतवणूकदारांना या दीड महिन्यात अनुभवावे लागले. दोन्ही निर्देशांक सार्वकालिक उच्चांकावरून अल्पावधीतच १० टक्क्यांहून अधिक गडगडले असून सेन्सेक्सने तब्बल ८,२८७.३ अंशांची घट अनुभवली आहे.

महिन्याभरापासून भूराजकीय घटनांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींसह देशांतर्गत आघाडीवर महागाईने पुन्हा डोके वर काढले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदी पुनरागमन झाल्याने रुपयाच्या तुलनेत अमेरिकी डॉलर मजबूत होत आहे. जोडीला देशांतर्गत समभागांच्या मूल्यांकनाच्या चिंतेने परदेशी गुंतवणूकदार वेगाने पाय काढत दुरावत चालले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन, कंपन्यांची निराशाजनक तिमाही कामगिरी आणि वाढत्या महागाईमुळे बाजारातील मंदीछाया तीव्र झाली आहे. सप्टेंबरअखेरपासून, परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमधून अंदाजे १.२० लाख कोटी रुपये (सुमारे १४ अब्ज डॉलर) काढून घेतले आहेत. डॉलरच्या बळकटीकरणामुळे जागतिक स्तरावर उदयोन्मुख-बाजारातील मालमत्तांवर ताण वाढला आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
government banks earned net profit
सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Asian development bank marathi news
विकासदर अंदाजाला ‘एडीबी’कडूनही ६.५ टक्क्यांपर्यंत कात्री
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर

हेही वाचा >>> पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष

ट्रम्प यांच्या उदयोन्मुख-बाजारासंबंधित धोरणांमुळे व्यापारात व्यत्यय निर्माण होण्याची आणि त्या परिणामी पुन्हा एकदा महागाई वाढण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा परदेशी गुंतवणूक आणि व्यापारावर काय परिणाम करू शकतात याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे. परिणामी, एमएससीआय आशिया पॅसिफिक निर्देशांक दोन महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरल्याने आशियाई बाजारपेठांना त्याची झळ जाणवू लागली आहे. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हसह इतर देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून व्याज दरकपातीचे चक्र सुरू होऊनही, भारतीय रिझर्व्ह बँकेने आपली महागाईसंबंधाने ताठर भूमिका कायम ठेवली आहे. लांबलेला मान्सून आणि हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्याने दरकपातीची शक्यता धूसर झाली आहे. यातून परदेशी गुंतवणूकदारांमधील स्थानिक बाजाराचे आकर्षण आणखीच कमी होणार आहे.

कंपन्यांची कमकुवत मिळकत कामगिरी, महागाई दराचा १४ महिन्यांतील उच्चांक आणि परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीच्या माऱ्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारार्थी परिणाम झाला आहे. आता रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या कालावधीत दरकपातीची आशा आहे.

विनोद नायरसंशोधन प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

उदयोन्मुख बाजारांसाठी, डॉलरची मजबुती आणि अमेरिकी रोख्यांच्या परताव्यामध्ये ४.४२ पर्यंतची तीव्र वाढ ही चिंतेची बाब आहे. रोख्यांवरील वाढलेल्या परताव्यामुळे बाजारपेठांतील गुंतलेला पैसा माघारी फिरून पुन्हा अमेरिकेची वाट धरेल. भारताच्या भांडवली बाजारासाठी ही बाब नकारात्मकच आहे. – डॉ. व्ही के विजयकुमार, इक्विटी प्रमुख, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस

Story img Loader