वृत्तसंस्था, नवी दिल्ली
देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीतील क्रमांक एकच्या मारुती सुझुकीने सर्वच पातळ्यांवर वाढलेली महागाई पाहता येत्या १ फेब्रुवारीपासून तिच्या विविध वाहनांच्या किमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढीचा निर्णय गुरुवारी जाहीर केला. उल्लेखनीय म्हणजे या कंपनीसह, बहुतांश वाहन निर्मात्यांनी वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या भरपाईमुळे वर्षारंभीच वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंमतवाढ जाहीर करताना मारुती सुझुकीने उत्पादन खर्चाचे गणित जुळवण्याचा ताण बळावल्याचे म्हटले आहे. खर्चाला शक्य तितकी आवर घालून किंमत न वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न सुरू होता. परंतु आता खर्चातील वाढीमुळे याचा भार काही प्रमाणात ग्राहकांवर किमती वाढवून लादला जाणार आहे.

हेही वाचा :CCPA Notice to Ola Uber : प्रवाशांच्या तक्रारीवरून केंद्र सरकारची उबर, ओलाला नोटीस; नेमके कारण काय?

कंपनीने याआधीच १ जानेवारीपासून ४ टक्क्यांपर्यंत किंमत वाढ केली आहे. आता त्यात १ फेब्रुवारीपासून आणखी भर पडणार आहे. कंपनीच्या कॉम्पॅक्ट कार सेलेरियोच्या किमतीत ३२,५०० रुपयांपर्यंत वाढ होईल, तर प्रीमियम मॉडेल एलएनव्हिक्टोच्या किमतीत ३०,००० रुपयांपर्यंत वाढ होईल.

हेही वाचा :SIP : लवकरच ‘इतक्या’ कमी रुपयांपासून एसआयपीला सुरुवात करता येणार

कंपनीचे सर्वाधिक खपाचे आणि लोकप्रिय वाहन असलेल्या वॅगन-आरची किंमत १५,००० रुपयांपर्यंत वाढेल तर स्विफ्टची किंमत ५,००० रुपयांपर्यंत वाढेल. एसयूव्ही श्रेणीतील ब्रेझा आणि ग्रँड विटारा यांच्या किमती अनुक्रमे २०,००० आणि २५,००० रुपयांपर्यंत वाढतील. अल्टो के१० च्या किमती १९,५०० रुपयांपर्यंत आणि एस-प्रेसोच्या ५,००० रुपयांपर्यंत वाढतील, असे मारुती सुझुकी इंडियाकडून सांगण्यात आले. याबरोबरच बलेनोची किंमत ९,००० रुपयांपर्यंत, फ्रॉन्क्सची किंमत ५,५०० रुपयांपर्यंत आणि कॉम्पॅक्ट सेडान धाटणीच्या डिझायरची किंमत १०,००० रुपयांपर्यंत वाढणार आहे.
कंपनी सध्या अल्टो के-१० हे ३.९९ लाख रुपयांपासून सुरू होणाऱ्या किमतीपासून ते २८.९२ लाख रुपयांपर्यंत किंमत असणाऱ्या इन्व्हिक्टो अशा विविध प्रवासी श्रेणीतील वाहनांची विक्री करते.