मारुती सुझुकी बस नामही काफी है, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मारुती भारतात सुरू झाल्यापासून तिच्या गाड्यांना तुफान मागणी आहे. परंतु आता ४० वर्षांनंतर प्रथमच मारुती सुझुकी असे काम करणार आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार श्रीमंत होण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकी इंडियाने मंगळवारी प्रति शेअर ९० रुपये लाभांश जारी केला, जो गेल्या ४० वर्षांच्या इतिहासातील सर्वोच्च आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे मारुतीचे १०,००० शेअर्स असतील तर त्याला प्रति शेअर ९० रुपये लाभांशानुसार ९०,००० रुपये नफा मिळेल. तसेच कंपनीच्या बोर्डाने अर्णब रॉय यांची मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून १६ ऑक्टोबरपासून प्रभावी आणि १ जानेवारी २०२४ पासून कंपनीचे पूर्ण वेळ CFO म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे.

४५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार

कंपनीचे सध्याचे CFO अजय सेठ ३१ डिसेंबरनंतर कंपनीच्या पूर्णवेळ पदावरून निवृत्त होतील. त्यानंतर ते कार्यकारी मंडळाचे (MEB) सदस्य म्हणून कायम राहतील. कंपनीच्या एजीएममध्ये बोलताना एमएसआयएलचे अध्यक्ष आरसी भार्गव म्हणाले, कंपनी ४५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. येत्या आठ वर्षांत (२०३१) कंपनीचे उत्पादन दोन दशलक्ष ते चार दशलक्षपर्यंत दुप्पट करण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.

Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
My Portfolio answer to finding right bearing NRB Bearings Limited
माझा पोर्टफोलिओ : सुयोग्य बेअरिंगच्या शोधाला उत्तर
Anil Aggarwal Success Story
Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक
Strict rules for SME IPOs SEBI steps in to protect interests of small investors print eco news
‘एसएमई आयपीओ’संबंधी नियम कठोर; छोट्या गुंतवणूकदारांच्या हितरक्षणासाठी ‘सेबी’चे पाऊल
RIT INVITs allowed to invest in unlisted companies
रिट्स, इन्व्हिट्सना असूचिबद्ध कंपन्यांत गुंतवणुकीस मुभा
Buying momentum from foreign investors print eco news
परकीय गुंतवणूकदारांकडून खरेदीला पुन्हा जोम; वर्षसांगतेला बाजाराला ‘सांता’तेजीची झळाळी शक्य
Investment opportunity in a large industrial group that is the backbone of the industrial world
उद्योगविश्वाचा कणा असलेल्या बड्या उद्योगसमूहात गुंतवणुकीची संधी; आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचा ‘काँग्लोमरेट फंड’ दाखल

हेही वाचाः LPG Gas Price : सबसिडी नव्हे, तर ३० महिन्यांनंतर थेट गॅस सिलिंडरच स्वस्त, तुमच्या शहरातील किंमत काय?

मारुती कंपनी 6 EV उत्पादन करेल

ते म्हणाले की, मारुती सुझुकी २०३० पर्यंत सहा इलेक्ट्रिक वाहने (EVs) बनवेल, जी गुजरात प्लांटमध्ये तयार केली जातील. या महिन्याच्या सुरुवातीला देशातील सर्वात मोठ्या कार निर्मात्याने EVs सह उत्पादनावर चांगली पकड मिळवण्यासाठी गुजरातमधील जपानी मूळ सुझुकी मोटरचा प्लांट विकत घेण्याची योजना उघड केलीय.

हेही वाचाः विश्लेषण : हायस्पीड 5 जी नेटवर्क, तीन वर्षांत २०० दशलक्ष ग्राहक; जिओ एअर फायबरची व्याप्ती काय? जाणून घ्या सविस्तर

कंपनीने २०३१ ची योजना सांगितली

एमएसआयएल आर्थिक वर्ष २०३१ पर्यंत आठ लाख कार निर्यात करेल, अशी अपेक्षा आहे. भार्गव म्हणाले की, आर्थिक वर्ष २०२३ पर्यंत ते २,५९,३३३ वाहनांची निर्यात करेल. जर आपल्याला कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास तो मंगळवारी बीएसईवर ९६२०.१० रुपयांवर बंद झाला. आकडेवारीनुसार, कंपनीचा शेअर ९५९५.०५ रुपयांवर उघडला होता आणि ९६७७.६५ रुपयांच्या दिवसाच्या उच्चांकावरही गेला होता. सध्या कंपनीचे बाजारमूल्य २.९० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात कंपनीच्या शेअरची किंमत १०,००० रुपयांच्या पुढे गेली होती.

Story img Loader