मुंबई : टाटा समूहातील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी, पूर्वनियोजनाप्रमाणे गुरुवारी जाहीर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीसीएसच्या संचालक मंडळाने भागधारकांना प्रतिसमभाग १० रुपये तिसरा अंतरिम लाभांश दिला आहे. तसेच मार्च २०२५ अखेर सरणाऱ्या आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी ६६ रुपये प्रतिसमभाग विशेष लाभांश देण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच एकूण ७७ रुपयांचा घसघशीत लाभांश भागधारकांना मिळणार आहे. येत्या ३ फेब्रुवारी रोजी भागधारकांना अंतरिम लाभांश आणि विशेष लाभांशाचे वाटप केले जाईल. यासाठी कंपनीने १७ जानेवारी ‘रेकॉर्ड’ दिनांक निश्चित केली आहे.

हे ही वाचा… “…तर ९९ टक्के भारतीय कामावर येणारच नाहीत”, नामांकित कंपनीच्या CEO चं विधान चर्चेत, नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया!

डिसेंबर अखेर सरलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा १२ टक्क्यांनी वधारून १२,३८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने ११,०५८ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता. तसेच कंपनीचा महसूल ५.६ टक्क्यांनी वधारून ६३,९७३ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर २०२३ अखेर तो ६०,५८३ कोटी रुपये राहिला होता.

कर्मचाऱ्यांची संख्या घटली

डिसेंबर तिमाहीत टीसीएसच्या कर्मचाऱ्यांची संख्या ५,३७० ने घटली आहे. त्याआधीच्या म्हणजेच सप्टेंबर तिमाहीतमध्ये मात्र ५,७२६ कर्मचाऱ्यांची भर पडली होती. सध्या टीसीएसमध्ये ६,०७,३५४ कर्मचारी कार्यरत आहेत.