रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना रिझर्व्ह बँकेने नियुक्त केलेल्या समितीने सुचविल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या स्पेशल ड्रॉइंग राईट्स (एसडीआर) बास्केटमध्ये भारतीय चलनाचा समावेश करण्याबाबतची शिफारसही आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिझर्व्ह बँकेच्या आंतरविभागीय गटाने कार्यकारी संचालक आर.एस.राथो यांच्या नेतृत्वाखाली याबाबत अहवाल सादर केला आहे. रुपयांच्या आंतरराष्ट्रीयीकरणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. याआधी करण्यात आलेल्या प्रयत्नांना यासाठी पुढे न्यावे लागेल, असे समितीने अहवालात म्हटले आहे. द्वीपक्षीय व्यापार करताना रुपयात व्यवहार करण्यास आणि अनिवासी भारतीयांना देशात व देशाबाहेर रुपयांमध्ये खाती उघडण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल, असेही समितीने अहवालात सुचविले आहे.

हेही वाचाः शेअर बाजाराने रचला इतिहास, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य प्रथमच ३०० लाख कोटींच्या पुढे

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आंतरराष्ट्रीय गंगाजळीसाठी एसडीआरची निर्मिती केली आहे. सदस्य देशांच्या अधिकृत गंगाजळीला पूरक अशी ही गंगाजळी असते. तिचा वापर सदस्य देश मुक्तपणे करू शकतात. एसडीआरमध्ये अमेरिकी डॉलर, युरो, चिनी येन, जपानी येन आणि ब्रिटिश पौंड या चलनांचा समावेश आहे. या चलनांच्या रुपाने सदस्य देशांना तरतलेचा पुरवठा केला जातो.

हेही वाचाः सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला; जून महिन्यात पीएमआय निर्देशांक ५८.५ गुणांवर घसरला

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Master plan of rbi rupee will soon become an international currency vrd