देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी एचडीएफसी लिमिटेडचे खासगी क्षेत्रातील अग्रेसर बँक असलेल्या एचडीएफसी बँकेत विलीनीकरण १ जुलैपासून प्रत्यक्षात येणार आहे, अशी घोषणा एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी मंगळवारी केली. भारताच्या उद्योग क्षेत्रातील हे आजवरचे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. एचडीएफसी लिमिटेड ही गृह वित्त कंपनी आता एचडीएफसी बँकेमध्ये विलीन होणार आहे. परिणामी भांडवली बाजारात एचडीएफसी लिमिटेडच्या समभागांचे व्यवहार थांबविले जाऊन तिच्या समभागांची सूचिबद्धता १३ जुलैपासून संपुष्टात (डिलिस्ट) येणार आहे, अशी माहिती एचडीएफसीचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी दिली.

दोन्ही संस्थांच्या संचालक मंडळाची येत्या ३० जून रोजी अंतिम बैठक पार पडणार असून, त्यात या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाऊन कार्यालयीन वेळेनंतर विलीनीकरणाच्या मंजुरीची औपचारिक घोषणा होईल. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेने गेल्या वर्षी ४ एप्रिल रोजी त्यांच्या विलीनीकरणाची योजना जाहीर केली होती. या विलीनीकरणापश्चात एचडीएफसी बँक ही १०० टक्के सार्वजनिक भागधारकांची मालकी असणारी कंपनी बनेल, तर एचडीएफसी लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांची एकत्रित एचडीएफसी बँकेत ४१ टक्के मालकी राहील. एचडीएफसी लिमिटेडच्या भागधारकांना त्यांच्याकडील २५ समभागांमागे, एचडीएफसी बँकेचे ४२ समभाग मिळणार आहेत.

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
amit shah in jalgaon during campaigning
भाजपचा अल्पसंख्यांकांना आरक्षण देण्यास विरोध; अमित शहा यांच्याकडून भूमिका जाहीर
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
HM Shri Amit Shah addresses public meeting in Shirala
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक; अमित शहा
Abhishek Lodha transferred 18 percent stake in the company to a charitable trust print eco news
आता लोढादेखील टाटांच्या दानकर्माच्या वाटेवर; धर्मादाय न्यासाला कंपनीतील १८ टक्के हिस्सा हस्तांतरित

हेही वाचा : चालू खात्यावरील तुटीत घट; जानेवारी ते मार्च तिमाहीत जीपीडीच्या ०.२ टक्क्यांपर्यंत कमी

आयसीआयसीआयपेक्षा दुप्पट मोठी बँक

तज्ज्ञांचा अंदाज आहे की, एचडीएफसी-एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतर, तब्बल १८ लाख कोटी रुपयांची मालमत्ता असणारी महाकाय बँक तयार होईल. विलीन झालेली संस्था ही स्टेट बँकेनंतर भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक असेल आणि खासगी क्षेत्रातील सध्या सर्वात मोठ्या आयसीआयसीआय बँकेच्या दुप्पट तिचे आकारमान असेल.

हेही वाचाः Adani Group Stocks : हिंडेनबर्गच्या अहवालावर आता गौतम अदाणी म्हणतात…

वित्तीय क्षेत्रातील ४५ वर्षांच्या वाटचालीत ९० लाख भारतीयांसाठी घर उपलब्ध करून देण्यात आम्ही योगदान दिले. आज आम्हालाच स्वतःसाठी घर शोधावे लागले आणि आम्हाला स्वतःच्या कौटुंबिक कंपनीत एचडीएफसी बँकेत अनुरूप घर सापडले, असंही एचडीएफसी लिमिटेडचे दीपक पारेख यांनी सांगितलं.