Satya Nadella Announcement: एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात भारताला पहिल्या प्राधान्याचा देश बनवण्याचा मानस व्यक्त करत मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन वर्षांत मायक्रोसॉफ्ट भारतातील एआयसंदर्भातल्या कौशल्य विकास व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. मंगळवारी बंगळुरूमधील मायक्रोसॉफ्ट एआय टूर कार्यक्रमात बोलताना सत्या नडेलांनी ही घोषणा केली आहे.

पुढील दोन वर्षांत ही सर्व गुंतवणूक मायक्रोसॉफ्टकडून केली जाणार असून त्याअंतर्गत भारतात नवीन डेटा सेंटर्स उभारण्याचं नियोजन कंपनीनं केलं आहे. सध्या भारतात मायक्रोसॉफ्टचे तीन डेटा सेंटर्स आहेत. येत्या दोन वर्षांत म्हणजेच २०२६पर्यंत कंपनीचं चौथं डेटा सेंटरदेखील कार्यरत होण्याची शक्यता आहे.

What Rajiv Kumar Said?
Rajiv Kumar : राजीव कुमार यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका, “हेलिकॉप्टर तपासलं गेल्यावर काहींनी घाणेरडी भाषा..”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
china leftover men reason
‘या’ देशात लग्नासाठी मुलांना मुलीच मिळेनात; ३.५ कोटी मुलांवर एकटे राहण्याची वेळ? कारण काय?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
taliban rules against afghan women
अफगाणिस्तानातील महिलांना एकमेकींचा आवाज ऐकण्यावर बंदी, कुराण पठणासही मनाई; तालिबानच्या नव्या फतव्यात काय?
Ajith racing accident
Ajith Kumar : साऊथ सुपरस्टार अजित कुमारचा मोठा अपघात, रेसच्या सरावदरम्यान क्रॅश झाली कार; दुर्घटनेचा Video Viral

भारतात एआय कौशल्यविकास उपक्रम

दरम्यान, भारतात गुंतवणूक करण्यासंदर्भातली घोषणा करतानाच सत्या नडेलांनी भारतीय तरुणांमधील एआयसंदर्भातल्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचंही जाहीर केलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या अॅडव्हांटेज इंडिया कार्यक्रमांतर्गत कंपनीकडून पुढच्या पाच वर्षांत किमान १ कोटी भारतीयांना एआयसंदर्भातील प्रशिक्षण देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. मायक्रोसॉफ्टच्या ग्लोबल स्किल्स फॉर सोशल इम्पॅक्ट उपक्रमाचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारत सरकार, स्वयंसेवी संस्था व व्यावसायिक संघटनांच्या मदतीने हे प्रशिक्षण दिलं जाईल.

वर्षभरात २४ लाख व्यक्तींना प्रशिक्षण

गेल्या वर्षभरात मायक्रोसॉफ्टनं २४ लाख भारतीयांना या प्रकारचं प्रशिक्षण दिल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यात तब्बल ६५ टक्के महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश होता. याशिवाय एकूण प्रशिक्षणार्थींपैकी ७४ टक्के प्रशिक्षणार्थी हे द्वितीय किंवा तृतीय श्रेणीतील शहरांमधले होते, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

सुंदर पिचाई, सत्या नडेला यांच्यापेक्षाही ‘हा’ भारतीय वंशाचा CEO अमेरिकेत घेतो सर्वाधिक वेतन?

“एआयच्या क्षेत्रात भारत वेगाने अग्रस्थानाच्या दिशेनं प्रगती करत आहे. देशभरात यातून नव्या संधी निर्माण होत आहेत. आज आम्ही एआयशी निगडित पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकासासाठी जाहीर करत असलेली गुंतवणूक ही भारताला एआय क्षेत्रात अग्रस्थानि नेण्याच्या आमच्या बांधिलकीचाच एक भाग आहे. या गुंतवणुकीचा देशभरातल्या व्यक्तींना आणि संस्थांना व्यापक प्रमाणावर फायदा होईल”, अशी प्रतिक्रिया यावेळी सत्या नडेला यांनी दिली.

Story img Loader