दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘को-ऑपरेटिव्ह बँक ऑफ इंडिया (सीओबीआय)’ या महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी गुजरात राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल यांची तर उपाध्यक्षपदी कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचेे अध्यक्ष मिलिंद काळे यांची सर्वसहमतीने निवड करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सीओबीआय’ ही देशातील सर्व सहकारी संस्था, नागरी सहकारी बँक आणि सहकारी बँका यांची सर्वोच्च शिखर संस्था आहे. सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या भक्कम बनवण्यासाठी ही संस्था संयुक्तरित्या अर्थपुरवठा करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, जेणेकरून ग्रामीण भागातील मोठे शेतीविषयक प्रकल्प, आयात-निर्यात व्यवसायांना आवश्यक मोठ्या रकमेचे कर्ज हे एकापेक्षा अधिक बँकांना एकत्र येऊन प्रदान करता येते.

हेही वाचाः अनिल अंबानींवर आणखी एक संकट; आता ‘ही’ कंपनी बंद होण्याची शक्यता

या संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया मिलिंद काळे यांनी व्यक्त केली.

हेही वाचाः ५ अन् १० नव्हे तर जुलैमध्ये ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण यादी

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Milind kale of cosmos bank as vice chairman of cobi vrd