देशातील श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अलीकडेच CBDT ने लक्षाधीश करदात्यांची गेल्या ३ वर्षांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार भारतात एक कोटी रुपयांपेक्षा जास्त पगार मिळवणाऱ्या करदात्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनानंतर यात आणखी भर पडली आहे. कोरोनाच्या काळातही लोकांच्या कमाईत वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे देशातील विकासाचा वेगही झपाट्याने वाढत आहे. अहवालानुसार, १ कोटींहून अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांची संख्या गेल्या ३ आर्थिक वर्षांत १,११,९३९ वरून १,६९,८९० वर पोहोचली आहे. २०१९-२० च्या तुलनेत हे प्रमाण ५१ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या ३ वर्षांत १ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची अधिकृत संख्या जवळपास ५१ टक्क्यांनी वाढली आहे.
१ कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढली
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी एक कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१९-२० या वर्षाच्या तुलनेत या करदात्यांची संख्या पाहिली तर त्यात अलीकडेच ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ५ लाखांपेक्षा जास्त प्राप्तिकर भरणाऱ्यांची संख्या केवळ ०.६ टक्क्यांनी जास्त आहे. हा आकडा वैयक्तिक करदात्याचा आहे. २०१८-१९ च्या तुलनेत केवळ १.१० कोटी करदाते ५ लाख ते १० लाख रुपयांच्या कर ब्रॅकेटमध्ये येतात. देशातील श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. एक कोटींपेक्षा जास्त कमावणारे सतत वाढत आहेत.
लोकांचे उत्पन्न वाढले
स्वातंत्र्यानंतर भारताने वेगाने विकासाची गती पकडली आहे. याबरोबरच लोकांच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. अहवालानुसार, गेल्या २० वर्षांच्या तुलनेत आता भारतीय दर महिन्याला चांगली कमाई करण्यास सक्षम आहेत.