गुगल आणि फेसबुक यांसारख्या कंपन्यांमधील नोकऱ्या गमावून २०२३ वर्षाची सुरुवात झाली. आता या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा भारतात पेटीएममध्ये नोकर कपातीच्या बातम्या येत आहेत. जागतिक स्तरावर Nike ने देखील २०२३ च्या अखेरीस शेकडो लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे २०२४ मध्येही नोकर कपातीचा हा टप्पा सुरू राहणार की काय अशी भीती निर्माण झाली आहे. नोकर कपात होणार नसेल तर कोणत्या क्षेत्रात नवीन नोकऱ्या मिळतील? असुरक्षित कर्जांबाबत आरबीआयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांच्या निर्बंधांनंतर अवघ्या काही दिवसांनंतर पेटीएमने सुमारे १ हजार जणांना काढून टाकल्याची बातमी आहे. गार्डियनच्या बातमीनुसार, Nike २०२३ वर्ष संपण्यापूर्वी शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकर कपातीची घोषणा करेल. त्याच्या सेवेच्या किमतीत २ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून, त्याची भरपाई ते नोकर कपातीतून करण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचाः IIT बॉम्बेच्या माजी विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; ५७ कोटींची दिली ऐतिहासिक देणगी

२०२३ मध्ये अनेकांनी नोकऱ्या गमावल्या

आपण जागतिक आकडेवारी बाजूला ठेवली तरी २०२३ हे वर्ष भारतासाठीही नोकऱ्या कमी होण्याच्या बाबतीत वाईट ठरले आहे. ‘Layoffs.FYI’ च्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये देशातील ११७५ लहान आणि मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी २.६० लाख लोकांना कामावरून काढून टाकले आहे. खरं तर २०२२ मध्ये १०६४ कंपन्यांनी १.६४ लाख लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्या होत्या. अशा प्रकारे नोकर कपातीच्या बाबतीत ५८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. भारतातील स्टार्टअप्समध्ये सर्वात वाईट टप्पा पाहायला मिळत आहे. जागतिक निधी बंद झाल्यानंतर देशातील सुमारे १०० स्टार्टअप कंपन्यांनी सुमारे १५ हजार लोकांना कामावरून काढून टाकले आहे. सर्वात वाईट परिस्थिती BYJU मध्ये पाहायला मिळाली, जिथे या वर्षी २५०० हून अधिक जणांच्या नोकऱ्या गेल्या.

हेही वाचाः इन्फोसिसला मोठा झटका, जागतिक कंपनीने १.५ अब्ज डॉलरचा करार केला रद्द

‘या’ कौशल्यांना २०२४ मध्ये मागणी असेल

जर आपण बाजाराचा कल पाहिला तर २०२४ मध्ये बहुतेक कंपन्यांच्या लोकांना त्यांच्या कार्यालयात परतावे लागणार आहे. कंपन्या आता बॅक टू ऑफिसवर भर देत आहेत. कंपन्या घरून काम करण्यापासून दूर जात आहेत, तरी वर्क फ्रॉम होम पूर्णपणे संपणार नाही. नवीन वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या लोकांना मागणी राहणार आहे. अशा परिस्थितीत लोकांना रि-स्किलिंग किंवा अप-स्किलिंगवर भर द्यावा लागेल. आणखी एक बदल दिसून येत आहे तो म्हणजे कंपन्या आता सॉफ्ट स्किल्सकडेही लक्ष देत आहेत. याचा अर्थ असा की, नियोक्ते लोकांच्या प्रभावी संवादाची आणि भावनिक बुद्धिमत्तेची कौशल्ये देखील तपासत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Millions of indians lost jobs in 2023 will there be a reduction in employment even in 2024 vrd