7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगाअंतर्गत एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने किमान पात्रतेबाबत सुधारणा केल्या आहेत. ही दुरुस्ती सातव्या वेतन आयोगांतर्गत संरक्षण कर्मचारी आणि सैनिकांना लागू होणार आहे. २२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या कार्यालयीन प्रसिद्धी पत्रकात मंत्रालयाने सेवा संरक्षण नागरी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी किमान पात्रता जारी केली आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी निकष जारी करण्यात आले आहेत.

‘या’ कर्मचाऱ्यांना अनुभवाची खूप गरज

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे की, विविध स्तरांसाठी वेगवेगळ्या कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्तर १ ते २ साठी तीन वर्षांचा अनुभव असावा. स्तर १ ते ३ साठी ३ वर्षांचा अनुभव असावा, स्तर २ ते ४ साठी ३ ते ८ वर्षांचा अनुभव असावा. त्याचप्रमाणे स्तर १७ पर्यंतच्या एकूण कर्मचाऱ्यांना १ वर्ष ते १२ वर्षांचा अनुभव असल्यास त्यांना पदोन्नती दिली जाणार आहे.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

हेही वाचाः मोठी बातमी : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदाचा दिला राजीनामा

तात्काळ अंमलात आणण्याचे आदेश

संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या माहितीनुसार, हे नवीन अपडेट लगेच प्रभावी होणार आहेत. म्हणजेच या अर्हतेखाली येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ पदोन्नती दिली जाणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना किती पदोन्नती दिली जाणार आहे, हे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हेही वाचाः टाटा समूहाला आणखी एक यश, एअर इंडिया आणि विस्ताराच्या विलीनीकरणाला CCI कडून ग्रीन सिग्नल

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काय अपडेट?

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात या महिन्यात जुलैमध्ये वाढ होऊ शकते, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ मिळू शकते, असा अंदाज आहे. ही वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता ४५ टक्क्यांपर्यंत वाढेल.

Story img Loader