लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : जागतिक बाजारातील संमिश्र कल आणि गुंतवणूकदारांनी बँकिंग, वित्त आणि ग्राहकोपयोगी वस्तू समभागांमध्ये केलेला विक्रीचा मारा, या परिणामी पाच सत्रातील तेजीपासून फारकत घेत शुक्रवारी भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक ओसरले. खनिज तेलाच्या वाढत्या किमती, घसरणारा रुपया आणि सतत परकीय निधीचे निर्गमन झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

मोठ्या अस्थिरतेने ग्रासलेल्या सप्ताहअखेरच्या व्यवहारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ६०९.२८ अंशांनी (०.८२ टक्के) घसरून ७३,७३०.१६ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ७२२.७९ अंश गमावत ७३,६१६.६५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दिवसातील ७४,५१५ या उच्चांकी स्तरापासून सेन्सेक्सने तब्बल ९०० अंशांची ही घसरगुंडी होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील १५०.४० अंश गमावले आणि दिवसअखेर तो २२,४१९.९५ पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>बँकांच्या भागधारकांना अनोखी अनुभूती; कुणा वाट्याला आनंद, कुणा पदरी दुःख!

सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. कंपनीच्या मार्च तिमाहीतील कमाई गुंतवणूकदारांना प्रफुल्लित करण्यास अपयशी ठरल्यानंतर, हा समभाग जवळपास ८ टक्क्यांनी घसरला. बजाज फिनसर्व्हमध्येही ३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. त्यापाठोपाठ इंडसइंड बँक, नेस्ले, कोटक महिंद्र बँक आणि महिंद्र अँड महिंद्र नकारात्मक राहिले. दरम्यान, माहिती तंत्रज्ञान कंपनी टेक महिंद्रच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने महसूल वाढ आणि कंपनीला गती देण्यासाठी महत्त्वाकांक्षी तीन वर्षांचा आराखडा जाहीर केल्यानंतर टेक महिंद्रने ७ टक्क्यांहून अधिक झेप घेतली. त्यापाठोपाठ विप्रो, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन आणि ॲक्सिस बँकेचे समभाग वधारले.

दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी सलग पाच सत्रात तेजी अनुभवल्यानंतर गुंतवणूकदारांकडून नफावसुली होणे स्वाभाविक असल्याने ही घसरण देखील अपेक्षित होती. जपानी चलन येन ३४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्यानंतर, तसेच अमेरिकेतील अर्थव्यवस्थेविषयक नकारात्मक आकडेवारीमुळे मध्यम मुदतीत व्याजदर कपातीची आशा मावळली आहे, असे मत मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) मत प्रशांत तापसे यांनी व्यक्त केले.

नफाफलक :

मारुती सुझुकी

नफा ३,८७७ कोटी

वाढ ४७.८ टक्के

लाभांश १२५ रुपये

बजाज फिनसर्व्ह

नफा २,११९ कोटी

वाढ २० टक्के

लाभांश १ रुपया

एसबीआय लाईफ

नफा ८११ कोटी

वाढ ४ टक्के

बजाज फायनान्स

नफा ३,८२४ कोटी

वाढ २१ टक्के

लाभांश ३६ रुपये

एचसीएल टेक

नफा ३,९८६

वाढ – (नगण्य)

लाभांश १८ रुपये