नवी दिल्ली : मोदी सरकारनले गेल्या दशकभरात केंद्रीय अर्थसंकल्पाला वेगळे रूप आणि नव्याने मांडणी मिळवून दिली. सरकारकडून विक्रमी खर्च ते सर्वसमावेशी विकास असा अर्थसंकल्पाचा या काळात प्रवास झाला आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केला.
सरकारने करदात्यांच्या पैशाचे मूल्य त्यांचा योग्य पद्धतीने वापर करून वाढविले आहे, असे नमूद करून सीतारामन म्हणाल्या की, मोदी सरकारने अर्थसंकल्पाची पद्धती आणि आकडे यात पारदर्शकता आणली. पारदर्शक अर्थसंकल्प असलेल्या देशांना कायम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यासारख्या जागतिक पातळीवरील संस्थाकडून प्राधान्य दिले जाते. यामुळे जागतिक पातळीवर देशाबद्दलच्या विश्वासात वाढ होते. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात या उलट परस्थिती होती.

हेही वाचा >>> पर्यावरण-स्नेही अभियांत्रिकी सल्लागार ‘झेड टेक’चा बुधवारपासून ‘आयपीओ’

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आधीच्या सरकारच्या काळात तुटीचे आकडे लपविण्याची पद्धत होती. कर्जे घेऊन आणि तेल रोख्यांद्वारे (ऑईल बाँड्स) वित्तीय बोजा पुढे येणाऱ्या सरकारांवर लोटण्याचे काम त्यावेळच्या सरकारने केले. त्यावेळी वित्तीय मानक पद्धतींमध्ये सातत्याने बदल करून अर्थसंकल्पातील आकडे सरकारच्या सोयीनुसार बदलण्यात आले. मागील चुकीच्या पद्धती टाळून मोदी सरकारने अर्थसंकल्पाची विश्वासार्हता वाढीस लावली आहे. आधी अर्थसंकल्प हा विक्रमी खर्चाचा असे. आताचा अर्थसंकल्प हा सर्वांच्या विकासाचा बनला आहे, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम पाहा फक्त एका मिस्ड कॉलवर; काय आहे नंबर अन् प्रोसेस? घ्या जाणून

करदात्याकडून मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा वापर सरकार योग्य पद्धतीने करीत आहे. त्यांना सार्वजनिक खर्चाचे पारदर्शी चित्र आता दिसत आहे. मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पामध्ये वित्तीय चौकटीचे पालन, पारदर्शकता, समावेशकता आणि सामाजिक विकास व पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक ही वैशिष्टे दिसली आहेत. – निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

Story img Loader