Modi Govt ESIC Scheme : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) जूनमध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत २०.२७ लाख नवीन सदस्य जोडले गेले आहेत. त्यामुळे जून महिन्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाने अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
किती नवीन आस्थापनांची नोंदणी झाली?
जूनमध्ये सुमारे २४,२९८ नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या आणि ESIC च्या सामाजिक सुरक्षा जाळ्यात आणल्या गेल्या. ESIC वेतनश्रेणी डेटानुसार, जून २०२३ मध्ये २०.२७ लाख नवीन कर्मचारी जोडले गेले आहेत, असंही गुरुवारी कामगार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. आकडेवारीनुसार, तरुणांसाठी अधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. जूनमध्ये जोडण्यात आलेल्या २०.२७ लाख कर्मचाऱ्यांपैकी ९.७७ लाख कर्मचारी हे २५ वर्षे वयोगटातील आहेत. हे एकूण संख्येच्या ४८.२२ टक्के आहे.
हेही वाचाः १ कोटींचा निधी जमवायचाय, मग म्युच्युअल फंडात १५X१५X१५ चा फॉर्म्युला वापरा अन् मग बघा…
आकडे काय सांगतात?
पेरोल डेटाच्या जेंडर विश्लेषणातून असे दिसून आले की, जूनमध्ये ३.८७ लाख नवीन महिला सदस्य ESIC मध्ये सामील झालेत. तसेच ७१ ट्रान्सजेंडर कर्मचारीदेखील याच कालावधीत ESIC मध्ये सामील झाले आहेत.
हेही वाचाः टीसीएसच्या मदतीनं BSNL 4G/5G मध्ये करणार क्रांती; तेजस नेटवर्कला मिळाली ‘इतक्या’ कोटी रुपयांची ऑर्डर
ESIC समाजातील प्रत्येक घटकाला लाभ देण्यासाठी वचनबद्ध आहे. पेरोल डेटा तात्पुरता आहे, कारण डेटा निर्मिती ही एक सतत चालणारा अभ्यास आहे, असंही विश्लेषणात नमूद करण्यात आलं आहे.