नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात कोणतेही बदल केलेले नाहीत. त्यामुळे १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या तिमाहीसाठी सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ), राष्ट्रीय बचत पत्र (एनएससी) तसेच अन्य अल्पबचत आणि पोस्टाच्या योजनांचे व्याजदर सध्या आहेत त्याच पातळीवर कायम राहतील, असा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केला.
हेही वाचा >>> एमक्यूआर फार्माची प्रत्येकी ९६० ते १००८ रुपयांना भागविक्री
आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीपासून अल्पबचत योजनांवरील व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. अल्पबचत योजनांच्या व्याजदराबाबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाहीला आढावा घेऊन, दर निर्धारित केले जात असतात.
जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी बँकेच्या बचत खात्यांवर वार्षिक ४ टक्के व्याज कायम राहणार आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवर (पीपीएफ) ७.१ टक्के, ११५ महिने मुदतीच्या किसान विकास पत्राकरिता ७.५ टक्के असा व्याज दर यापुढेही असेल. सुकन्या समृद्धी खाते योजनेवर वार्षिक ८.२ टक्के स्थिर दर आहे. विविध बचत योजनांवरील व्याजदर दराचे तिमाहीला निर्धारणाची प्रक्रिया एप्रिल २०१६ पासून सुरू झाली. एप्रिल २०१६ नंतर व्याज दरात लक्षणीय कपात केली गेली होती.
हेही वाचा >>> टाटा स्टीलचा ब्रिटनमधील प्रकल्प अडचणीत; कंपनीचे कामगार संघटनेसह संपाविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल
जुलै ते सप्टेंबर तिमाहीसाठी लागू व्याज दर
सुकन्या समृद्धी खाते ८.२ %
सार्व. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) ७.१ %
किसान विकास पत्र ७.५ %
बँक बचत खाते ४ % राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ७.७ %