पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७७ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशातील कामगारांसाठी मोठी घोषणा केली आहे. येत्या विश्वकर्मा जयंतीला देशात ‘विश्वकर्मा योजना’ ही नवी योजना सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना देशात फर्निचर किंवा लाकडाचे काम करणाऱ्या, सलून चालवणाऱ्या, शूज बनवणाऱ्या आणि घरे बांधणाऱ्या गवंडींना आर्थिक मदत करणार आहे. तसेच पारंपरिक कौशल्य असलेल्यांसाठी पुढील महिन्यात सरकार १३,००० ते १५,००० कोटी रुपयांची विश्वकर्मा योजना सुरू करेल, असंही मोदींनी सांगितलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ‘स्वानिधी योजने’द्वारे देशातील करोडो रस्त्यावरील विक्रेत्यांना ५०,००० कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली आहे. आता अशाच पद्धतीची मदत देशातील करोडो कामगारांना करायची आहे, जे गरिबीत जीवन जगत आहेत. त्यापैकी बहुतांश ओबीसी समाजातील आहेत, असंही मोदींनी अधोरेखित केलं.
हेही वाचाः Money Mantra: यशस्वी गुंतवणूकदार व्हायचेय? मग ‘या’ गोष्टींचं पालन करा अन् बघा..
आमचे कामगार असोत, सोनार असोत, गवंडी असोत, धोबी असोत किंवा केस कापणारे कुटुंब असोत, अशा लोकांना बळ देण्यासाठी सरकार ‘विश्वकर्मा योजना’ आणणार आहे. त्यांना आर्थिक बळ दिले जाणार असल्याचंही पंतप्रधान मोदींनी सांगितले.
हेही वाचाः Independence Day Sale : फक्त १५१५ रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी, जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच दिली हमी
येत्या पाच वर्षांत देश पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान घेईल, याची हमी मोदीच असल्याचे ते म्हणाले. गरिबीतून बाहेर आलेले १३.५ कोटी लोक मध्यमवर्गाची शक्ती बनत आहेत. गावाची ताकद वाढली की शहरांची आर्थिक अर्थव्यवस्था झपाट्याने वाढते. हे बळ देऊन आम्हाला पुढे जायचे आहे.