पै अन् पैवर अवलंबून असणारी आणि रोज दोन वेळच्या रोजीरोटीच्या जुगाडात गुंतलेली एखादी व्यक्ती आपला उदरनिर्वाह कसा होईल याच विचारात असते. परंतु अशा व्यक्तीच्या खात्यात अचानक करोडो रुपये आले तर कसे वाटेल. पश्चिम बंगालमधील रोजंदारीवर काम करणारे मोहम्मद नसिरुल्लाह मंडल यांनीसुद्धा आयुष्याच्या प्रवासात असा काळ अनुभवला आहे. नशिबात गरिबी लिहिली असल्यानं दोन वेळच्या भाकरीसाठी ते अपार कष्ट करतात. परंतु त्यांच्याच बाबतीत एक वेगळा प्रसंग घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेमधील एका बातमीनुसार, मंडल यांच्या खात्यात फक्त १७ रुपये यायचे. परंतु इतर कोणतेही उत्पन्न नसल्याने त्यांनी कधीही आपली शिल्लक तपासण्याचे कष्ट घेतले नाहीत. अचानक एका सकाळी सायबर सेलचे काही अधिकारी त्यांच्या घरी नोटीस घेऊन पोहोचले. त्यांच्या खात्यात १-२ नव्हे तर १०० कोटी रुपये जमा झाल्याची माहिती त्या अधिकाऱ्यांकडूनच मंडल यांना मिळाली. सायबर सेलने मंडल यांना नोटीस पाठवून ३० मे रोजी बोलावले आहे, जिथे खात्यात अचानक पैसे आल्याबद्दल चौकशी केली जाणार आहे.

माझी तर झोपच उडाली

पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बासुदेवपूर येथील रहिवासी मोहम्मद नसिरुल्लाह मंडल म्हणतात की, पोलिसांचा फोन आल्यानंतर त्यांची झोपच उडाली आहे. मी काय केले हे मलाही माहीत नाही. अचानक माझ्या खात्यात १०० कोटी रुपये आले आणि खरे सांगायचे तर माझा विश्वासच बसेना. मी माझे खाते अनेक वेळा तपासले आणि प्रत्येक वेळी मी त्यात १०० कोटी जमा असल्याचे पाहिले, त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. यानंतरही मी थेट पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) शाखेत धाव घेतली आणि या व्यवहाराची चौकशी केली.

हेही वाचाः ‘एसव्हीबी’च्या ५०० कर्मचाऱ्यांना नारळ; फर्स्ट सिटीझन्स बँकेने उचलले मोठे पाऊल

खाते जप्त केले आहे

नसिरुल्लाह यांनी सांगितले की, बँकेत गेल्यावर त्यांना कळले की त्यांचे खाते ब्लॉक झाले आहे. ब्लॉक होण्यापूर्वी त्याच्या खात्यात फक्त १७ रुपये होते. मात्र, जेव्हा त्यांनी Google Pay द्वारे त्याचे खाते तपासले, तेव्हा त्यात जमा केलेली रक्कम ७ अंकांमध्ये दिसून आली. शेवटी माझ्या खात्यात एवढी मोठी रक्कम आली कुठून. मी रोजंदारी करणारा मजूर आहे. पोलीस मला पकडून मारतील, या भीतीने मी दिवस घालवला. माझ्या घरीही लोक रडायला लागले. बँकेने माझे खातेही तात्पुरते निलंबित केले आहे.

हेही वाचाः बँक ऑफ महाराष्ट्र कर्ज वितरणात अव्वल; २६०२ कोटींचा मिळवला निव्वळ नफा

आता पोलिसांत गुन्हा दाखल होणार

याप्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्यापूर्वी तुम्हाला कोणतीही माहिती देता येणार नाही, असे बँक अधिकाऱ्यांनी मंडल यांना सांगितले. हा पैसा कोणाचा आणि त्यावर कोणाचा दावा आहे. या पैशाचे काय करायचे, या सर्वांची उत्तरे पोलिसांच्या तपासानंतरच मिळू शकतील. ३० मे रोजी पोलिसांच्या चौकशीत काय उत्तर द्यावे लागणार आहे, याची भीतीही सध्या मंडल यांना सतावते आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammed nasirullah mandal became a billionaire overnight rs 100 crore credited in bank account vrd