प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत पुढच्या महिन्यात येऊन ठेपल्याने विवरणपत्र दाखल करणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, २६ जूनपर्यंत सुमारे १ कोटींहून अधिक करदात्यांनी विवरणपत्र दाखल केली आहेत. पगारदार करदात्यांना आणि ज्यांना त्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची आवश्यकता नाही अशा करदात्यांसाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात कमावलेल्या उत्पन्नासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.
१ कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याचा टप्पा मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत या वर्षी १२ दिवस आधी गाठला गेला आहे. गेल्या वर्षी ८ जुलैपर्यंत १ कोटी करदात्यांनी विवरणपत्र दाखल केले होते. त्या तुलनेत यावर्षी २६ जूनलाच हा टप्पा गाठला आहे.
हेही वाचाः एचडीएफसीचे येत्या १ जुलैपासून एचडीएफसी बँकेत विलीनीकरण
मुदतीत विवरणपत्र भरण्याचे आवाहन
अंतिम मुदत जवळ आल्याने विवरणपत्रे भरणासाठी संकेतस्थळावर होणाऱ्या गर्दीमुळे करदात्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणूनच
शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी करदात्यांनी लवकर विवरणपत्र दाखल करण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.
हेही वाचा: चालू खात्यावरील तुटीत घट; जानेवारी ते मार्च तिमाहीत जीपीडीच्या ०.२ टक्क्यांपर्यंत कमी