प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागच्या आठवड्याभरापासून पडझड सुरु होती. आज मंगळवारी ही पडछड थांबली. Adani Wilmar पासून Adani Port पर्यंत आठ शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळाली, तर दोन कंपन्यांचे शेअरचे भाव उतरले. Adani Enterprises या शेअरचा तर सकाळपासूनच चढता आलेख पाहायला मिळाला. तब्बल १४.२८ टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये पाहायला मिळाली. २४ जानेवारी रोजी अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदाणी समूहाच्या शेअर्समधील फेरफारबाबतचा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर शेअर बाजारात भूकंप आला होता. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार होता, त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारावर काहीसा तणाव पाहायला मिळाला. मात्र अदाणी समूहाने एफपीओची गुंतवणूक परत करण्याचा घेतलेला निर्णय असो किंवा एसबीआय कर्जाबाबत दिलेली माहिती, त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा आश्वासक चित्र पाहायला मिळाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा