Hurun India Rich List 2023 : ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी अदाणी ग्रुपचे प्रमुख गौतम अदाणी यांना मागे टाकून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा खिताब पुन्हा एकदा मिळवला आहे. हुरुन इंडिया आणि ३६०वन वेल्थने ३६० वन वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट २०२३ जारी केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची ही १२वी वार्षिक रँकिंग आहे. या यादीत गौतम अदाणी यांची संपत्ती मुकेश अंबानींच्या तुलनेत खूपच कमी आहे, कारण जानेवारी महिन्यात आलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे अदाणी समूहाच्या निव्वळ संपत्तीत लक्षणीय घट झाली होती.
मुकेश अंबानींची संपत्ती किती वाढली?
अहवालात असे म्हटले आहे की, गेल्या दशकात रिलायन्स इंडस्ट्रीजने १५० बिलियन डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे, जी भारतातील इतर कोणत्याही समूहापेक्षा जास्त आहे. या कालावधीत मुकेश अंबानी यांची संपत्ती २०१४ मधील १,६५,१०० कोटी रुपयांवरून २०२३ मध्ये अंदाजे ८,०८,७०० कोटी रुपयांपर्यंत वाढली, जी चार पट वाढ दर्शवते.
हेही वाचाः बँक ऑफ बडोदाचे सणासुदीच्या काळात ग्राहकांना गिफ्ट, FD वर व्याजदरात केली वाढ
गौतम अदाणी दुसऱ्या स्थानावर घसरले
अहवालानुसार, अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी ४७४,८०० कोटी रुपयांच्या मालमत्तेसह दुसऱ्या स्थानावर घसरले आहेत. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला हे भारतातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची संपत्ती २,७८,५०० कोटी रुपये आहे.
हेही वाचाः HDFC बँकेच्या ग्राहकांचा EMI वाढणार, बँकेने MCLR दर वाढवला
शिव नाडर यांच्याकडे किती मालमत्ता?
एचसीएलचे शिव नाडर यांच्याकडे २,२८,९०० कोटी रुपयांची संपत्ती असून, ते या यादीत चौथ्या स्थानावर आहेत. यानंतर गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंब १,७६,५०० कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे. सन फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे संस्थापक आणि नेते दिलीप सांघवी हे १,६४,३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत.
टॉप १० मध्ये आणखी कोणाचा समावेश आहे?
एल एन मित्तल आणि कुटुंबाकडे १,६२,३०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर राधाकिशन दमाणी यांच्याकडे १,४३,९०० कोटी रुपयांची संपत्ती, कुमार मंगलम बिर्ला आणि कुटुंब १,२५,६०० कोटी रुपयांची संपत्ती आणि नीरज बजाज आणि कुटुंब १,२०,७०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. हे टॉप १० च्या यादीत आहेत.
पाच वर्षांत मोठी वाढ
३६० वनचे सह-संस्थापक आणि ३६० वन वेल्थचे संयुक्त सीईओ यतीन शाह म्हणाले की, आता १,३१९ व्यक्तींकडे १,००० कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची संपत्ती आहे. गेल्या पाच वर्षांत ७६ टक्के वाढ झाल्याचे ते म्हणाले. या लोकांची संपत्ती १०९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी सिंगापूर, यूएई आणि सौदी अरेबियाच्या एकत्रित जीडीपीपेक्षा जास्त आहे. ते म्हणाले की, यावर्षीची यादी देशातील महान उद्योजकतेची भावना अधोरेखित करते, ज्यामध्ये ६४ टक्के लोक स्वत:च्या बळावर उभे राहिले आहेत.