वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतातील धनाढ्यांची संख्या सरलेल्या वर्षात वाढली असून २०२३ मधील १६९ वरून ती आता २०० वर पोहोचली असून, त्यांची एकूण संपत्तीही या काळात ६७५ अब्ज डॉलरवरून विक्रमी ९५४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वर्षभराच्या कालावधीत त्यांच्या श्रीमंतीत तब्बल ४१ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांसाठी नसले तरी या धनदांडग्यांसाठी ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे. फोर्ब्स या अमेरिकी मासिकाने नुकतीच ‘फोर्ब्स जागतिक अव्वल २०० अब्जाधीशांची यादी प्रसिद्ध केली असून, त्यात २५ भारतीयांचा समावेश आहे.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर

आघाडीच्या २०० जागतिक धनाढय़ांच्या फोर्ब्स सूचीत स्थान मिळविणाऱ्या यादीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे जागतिक सूचीत नवव्या क्रमांकावर, तर भारतातील महाश्रीमंतांच्या सूचीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती २०२३ मधील ८३ अब्ज डॉलरवरून ३९.७६ टक्क्यांनी वाढून ११६ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. १०० अब्ज डॉलर संपत्तीच्या गटात सामील होणारे ते एकमेव भारतीय व्यक्ती आहेत. अंबानी यांनी जगातील नवव्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आणि भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे.

हेही वाचा >>>‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे ८४ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. तर भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदल आहेत, त्यांनी आता चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. वर्षभरापूर्वी त्या सहाव्या स्थानावर होत्या. त्यांची एकूण संपत्ती ३३.५ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्स २०२४ च्या यादीत २५ भारतीय अब्जाधीशांचाही समावेश आहे. ज्यामध्ये यंदा नरेश त्रेहान (मेदांताचे व्यवस्थापकीय संचालक), रमेश कुन्हीकन्नन (केनेस टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक), आणि रेणुका जगतियानी (लँडमार्क समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी) यांचा समावेश आहे. दरम्यान, ‘बैजूज’चे संस्थापक रवींद्रन बैजू आणि रोहिका मिस्त्री यांना यंदा या सूचीतून वगळण्यात आले आहे.

जागतिक महाश्रीमंत

बर्नार्ड अरनॉल्ट आणि कुटुंबाची एकूण संपत्ती २३३ अब्ज डॉलर असून, त्यापाठोपाठ एलॉन मस्क (१९५ अब्ज डॉलर), जेफ बेझोस (१९४ अब्ज डॉलर), मार्क झुकरबर्ग (१७७ अब्ज डॉलर), लॅरी एलिसन (११४ अब्ज डॉलर), वॉरन बफे (१३३ अब्ज डॉलर), बिल गेट्स (१२८ अब्ज डॉलर), स्टीव्ह बामर (१२१ अब्ज डॉलर) आणि लॅरी पेज (११४ अब्ज डॉलर) यांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या जागतिक सूचीनुसार, पूर्वीपेक्षा अब्जाधीशांची संख्या वाढून एकूण २,७८१ वर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १४१ अब्जाधीशांची भर पडली आहे. शिवाय त्यांच्याकडे १४.२ लाख कोटी डॉलरची एकत्रित निव्वळ संपत्ती आहे.

भारतीय महाश्रीमंत आणि संपत्ती

मुकेश अंबानी – ११६ अब्ज डॉलर

गौतम अदानी – ८४ अब्ज डॉलर

शिव नाडर – ३६.९ अब्ज डॉलर

सावित्री जिंदल – ३३.५ अब्ज डॉलर

दिलीप संघवी- २६.७ अब्ज डॉलर

सायरस पूनावाला – २१.३ अब्ज डॉलर

कुशल पाल सिंग – २०.९ अब्ज डॉलर

कुमारमंगलम बिर्ला – १९.७ अब्ज डॉलर

राधाकिशन दमानी – १७.६ अब्ज डॉलर

लक्ष्मी मित्तल – १६.४ अब्ज डॉलर