आशियातील सर्वात श्रीमंत माणूस अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ही केवळ देशातील सर्वात मौल्यवान कंपनी नाही, तर उलट भारत सरकारला कर भरण्याच्या बाबतीतही ती खूप पुढे आहे. कंपनीने १६,००० कोटींहून अधिक कर भरून नवा विक्रम केला आहे. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) मुकेश अंबानी यांनी सांगितले की, कंपनीने २०२२-२३ या आर्थिक वर्षात १६,६३९ कोटी रुपयांचा थेट कर भरला आहे. इतकंच नाही तर एजीएममध्ये कंपनीने आपल्या वार्षिक कामगिरीची माहिती दिली.

रिलायन्सने कमाई-नफ्याचा विक्रम केला

रिलायन्स इंडस्ट्रीजने २०२२-२३ मध्ये ९,७४,८६४ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळवला आहे. यामध्ये कर भरण्यापूर्वी कंपनीचा नफा १,५३,९२० कोटी रुपये झाला आहे. तसेच कंपनीचा निव्वळ नफा ७३,६७० कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आजपर्यंतची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
Chandrapur district Cash, liquor, drugs seized,
चंद्रपूर: रोकड, दारू, ड्रग्ज जप्त
Maharashtra government financial burden
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?
LIC net profit falls to Rs 7621 crore print eco news
एलआयसीचा निव्वळ नफा घसरून ७,६२१ कोटींवर; बाजार वर्चस्वासह, हिस्सेदारी वाढून  ६१ टक्क्यांपुढे
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

हेही वाचाः आता मुकेश अंबानी विकणार विमा, एलआयसीला टक्कर देण्यासाठी बनवली जबरदस्त योजना

देशात १२ लाख कोटींची गुंतवणूक

मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या १० वर्षांत देशात १५० अब्ज डॉलर (सुमारे 12,39,390 कोटी रुपये) गुंतवले आहेत. देशातील इतर कोणत्याही खासगी कंपनीने केलेली ही सर्वाधिक गुंतवणूक आहे. एवढेच नाही तर रिलायन्स इंडस्ट्रीज देशात रोजगार देण्याच्या बाबतीतही पुढे आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने २.६ लाख नोकऱ्या जोडल्या आहेत. तसेच कंपनीच्या सर्व मिळून कर्मचार्‍यांची संख्या ३.९९ लाख झाली आहे.

हेही वाचाः चांद्रयान ३ चा उल्लेख करत मुकेश अंबानी म्हणाले, ”नव्या भारताला रोखणे अशक्य…”

सामाजिक कार्यावर खर्च

रिलायन्स इंडस्ट्रीज तिच्या रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) वर खर्च करते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात कंपनीने CSR वर १,२७१ कोटी रुपये खर्च केले आहेत. नीता अंबानींबाबत रिलायन्सच्या एजीएममध्ये आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी ईशा, आकाश आणि अनंत या तिघांचाही कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, नीता अंबानी या रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी कायम राहतील.