मुंबई : मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १,८६,४४० कोटी रुपये कराचा भरणा केला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ९ हजार कोटी अधिक आहे. २०२२-२३ मध्ये कंपनीने १,७७,१७३ कोटी रुपये कर भरणा केला होता, असे कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालातून बुधवारी स्पष्ट झाले.

देशांतर्गत भांडवली बाजारात २० लाख कोटी बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडणारी एकमेव कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल गेल्या वर्षाच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वधारले आहे. तर जागतिक पटलावर सर्वाधिक बाजार भांडवल असणारी ती ४८ व्या क्रमांकाची कंपनी आहे. कंपनीचा एकत्रित महसूलदेखील सरलेल्या आर्थिक वर्षात १० लाख कोटींपुढे गेला आहे. वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीने ३ लाख कोटी रुपयांची निर्यात केली. तर याच कालावधीत १.३५ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक तिने वेगवेगळ्या व्यवसायांत केली.

fees Increase in military schools in maharashtra in after twenty years
राज्यातील सैनिकी शाळांच्या शुल्कात वीस वर्षांनी वाढ; ‘एनडीए’तील मराठी मुलांचा टक्का वाढविण्यासाठी धोरणात सुधारणा
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
maharashtra Mahayuti Govt schemes
Financial Burden on Maharashtra: मतदारांना आकर्षित करण्यासाठी २०० घोषणा; प्रतिवर्षी १ लाख कोटींचा बोजा; निवडणुकीसाठी महायुतीकडून राज्यावर बोजा?
GST tax evasion of Rs five to eight thousand crore through fake documents Main facilitator arrested from Gujarat
बनावट कागदपत्रांद्वारे पाच ते आठ हजार कोटी रुपयांची जीएसटी कर चुकवेगिरी; गुजरातमधून मुख्य सूत्रधार अटकेत
Ratan Tata Will Tito dog
Ratan Tata Will: रतन टाटांनी १० हजार कोटींची संपत्ती सोडली, इच्छापत्रात श्वानाचीही केली सोय; नोकर, भाऊ-बहीण, शंतनू नायडूचाही उल्लेख
7367 crore investment in gold etfs in 2024
गोल्ड ईटीएफमध्ये २०२४ मध्ये ७,३६७ कोटींची गुंतवणूक
profit of kpit technologies in automotive sector
 ‘केपीआयटी’ला २०३ कोटींचा तिमाही नफा
vidhan sabha expenditure limit
मर्यादा चाळीस लाखांची… झाकली मूठ कैक कोटींची !

हेही वाचा >>> ॲस्थेटिक इंजिनीयर्सचा ‘आयपीओ’ आजपासून खुला

नफ्याच्या आघाडीवरही कंपनीची कामगिरी सरस ठरली असून, तिने ७९ हजार कोटींचा करोत्तर नफा मिळवला आहे. मागील आर्थिक वर्षातील ७३,६७० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा निव्वळ नफा ७.३ टक्के अधिक राहिला आहे.

अंबानी ‘शून्य’ वेतनावर कार्यरत

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सलग चौथ्या वर्षी कंपनीकडून ‘शून्य’ वेतन घेतले आहे. याआधी २००८ ते २०२० पर्यंत त्यांनी वार्षिक १५ कोटी रुपये वेतन घेतले होते. मात्र करोनाच्या काळापासून त्यांनी कंपनीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी वेतन नाकारले. नवीनतम वार्षिक अहवालानुसार, पगार, भत्ते आणि अनुलाभ तसेच सेवानिवृत्ती लाभ म्हणून त्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये एक रुपयाही मिळविलेला नाही. तथापि १०९ अब्ज डॉलरच्या मालमत्तेसह जगातील ११ वे श्रीमंत व्यक्ती असलेले अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे रिलायन्सचे ३३२.२७ कोटी समभाग म्हणजेच ५०.३३ टक्के हिस्सेदारी आहे. परिणामी २०२३-२४ मध्ये लाभांशापोटी त्यांना ३,३२२.७ कोटी रुपये मिळविले आहेत.