आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याशी संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांनी आपले घर विकले आहे. जर तुम्ही विचार करत असाल की, त्यांनी मुंबईतील अँटिलिया हे घर विकले आहे, तर तुम्ही गैरसमज करून घेत आहात. त्यांनी आपली न्यूयॉर्क स्थित मॅनहॅटन निवासी मालमत्ता विकली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी त्यांचा लक्झरी फ्लॅट ७४.५३ कोटी रुपयांना म्हणजेच ९ मिलियन डॉलरला विकला आहे. खरं तर मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासह मुंबईतील अँटिलिया येथे राहतात, जे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.

घराची खासियत काय आहे?

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानींनी विकलेला फ्लॅट मॅनहॅटनमधील सुपीरियर इंक नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आहे. या इमारतीत एकूण १७ मजले आहेत. दोन बेडरूम्स व्यतिरिक्त या फ्लॅटमध्ये तीन बाथरूम आणि शेफचे किचनदेखील आहे. या सगळ्याशिवाय हा फ्लॅट १० फूट उंच आहे आणि फ्लोअरिंग हेरिंगबोन हार्डवुडचे आहे. या फ्लॅटच्या सर्व खिडक्या नॉइज प्रूफ आहेत. मुकेश अंबानींच्या फ्लॅटच्या शेजाऱ्यांमध्ये हिलरी स्वँक आणि मार्क जेकब्स यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश होता. विशेष म्हणजे फ्लॅटच्या समोरचे दृश्य अतिशय विहंगम आहे, तिथून समोरच हडसन नदी पाहायला मिळते.

हेही वाचाः अदाणी विल्मरपासून वेगळे होणार गौतम अदाणी? विकू शकतात ४४ टक्के शेअर्स, अचानक निर्णय का?

२००९ मध्ये इमारतीत बदल करण्यात आले

सुपीरियर इंकबद्दल बोलायचे झाल्यास ते पूर्वी कारखान्याच्या स्वरूपात होते. त्यानंतर जवळपास ९० वर्षांनंतर म्हणजे २००९ मध्ये रॉबर्ट एएम स्टर्न आर्किटेक्ट्स आणि याबू पुशेलबर्ग यांनी इमारतीमध्ये काही महत्त्वाचे बदल केले.

हेही वाचाः भारत बनला जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था, चीनने अमेरिकेला टाकले मागे, जपान-रशिया कोणत्या स्थानी?

तेव्हा मुकेश अंबानी यांनी इथे एक प्लॅट खरेदी केला आणि तो आता विकला. मुकेश अंबानी यांचे मुंबईतील घर अँटिलिया हे जगातील सर्वात महागड्या घरांमध्ये गणले जाते. एकूण ४,५३२ स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या घरामध्ये एकूण २७ मजले आहेत. जगातील सर्व सुविधा या घरात आहेत.

Story img Loader