आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी दिल्ली एनसीआरजवळ एक मोठा प्रकल्प तयार करीत आहेत. दिल्ली एनसीआरच्या या भागात ते जागतिक दर्जाचे एक नवं शहर उभारणार आहेत. ही एक प्रकारची स्मार्ट सिटी असेल. रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी मॉडेल इकॉनॉमिक टाऊनशिप एनसीआरमध्ये आपली स्मार्ट सिटी बनवणार आहे. दिल्ली एनसीआरचे मोठे आर्थिक क्षेत्र असलेल्या गुरुग्रामजवळील हरियाणातील झज्जर येथे MET सिटी बांधण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इथे एक ग्रीनफिल्ड सिटी विकसित करण्यात येणार असून, हे शहर आठ हजार एकर जागेवर उभारले जात आहे. २२० केव्ही पॉवर सबस्टेशन, पाणीपुरवठा, नेटवर्क आणि ट्रीटमेंट प्लांट आणि रस्त्यांचे जाळे यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा इथे आधीच अस्तित्वात आहेत. त्यामुळे ही MET सिटी बांधणं काहीसं सोपं जाणार आहे.
हेही वाचाः टाटा समूहाच्या ‘या’ ३ कंपन्या आठवड्याभरात देणार लाभांश, गुंतवणूकदारांना किती फायदा?
जपानच्या चार दिग्गज कंपन्यांचा सहभाग असणार
सध्या नवी रिलायन्स स्मार्ट सिटी ही ४ जपानी कंपन्यांचे नवीन घर असल्याचंही बोललं जातंय, जिथे निहोन कोहेन, पॅनासोनिक, डेन्सो आणि टी-सुझुकी यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा सहभाग आहे. निहोन कोहेनचे उत्पादन युनिट हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन युनिट असेल. MET सिटी ही जपानी औद्योगिक टाऊनशिपवर आधारित आहे. MET सिटीचे CEO SV गोयल यांच्या मते, कंपनीचे ४०० हून अधिक औद्योगिक ग्राहक आहेत. त्यांनी “उत्तर भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ग्रीनफिल्ड स्मार्ट शहरांपैकी एकमध्ये “वॉक-टू-वर्क मास्टरप्लॅन” तयार केला आहे. हे शहर तिथे युनिट्स उभारणाऱ्या कंपन्यांना प्लग-एन-प्ले पायाभूत सुविधाही पुरवते.
हेही वाचाः Cowin पोर्टलवरून डेटा लीक? टेलिग्रामवर करोडो लोकांचा वैयक्तिक तपशील उपलब्ध, केंद्र सरकार चौकशी करणार
‘या’ सुविधा शहरात असणार
नवीन रिलायन्स सिटीच्या प्रमुख ठळक वैशिष्ट्यांमध्ये दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि क्षेत्रातील इतर शहरांशी मजबूत कनेक्टिव्हिटी राहणार आहे. हे शहर कुंडली मानेसर पलवल (KMP) एक्सप्रेसवे आणि नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ स्थित आहे. ते दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर म्हणजेच DMIC च्या समर्पित फ्रेट कॉरिडॉरशी रेल्वे कनेक्टिव्हिटीने जोडलेले असेल. MET सिटी वेबसाइटनुसार, फ्री होल्ड जमीन ही त्वरित विकासासाठी पूर्णपणे तयार आहे. शैक्षणिक सुविधेच्या बाबतीत, SGT विद्यापीठ आणि माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागचे सेहवाग स्कूल शहराच्या अगदी जवळ आहे आणि एम्स सुविधा MIT शहराच्या अगदी जवळ आहेत.