Costliest Cities To Live, Mumbai Ranking: मर्सरच्या या वर्षीच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँग काँगने टॉप गाठलं आहे. या यादीत नवी दिल्ली १६४ व्या, चेन्नई १८९ व्या, बेंगळुरू १९५ व्या, हैदराबाद २०२ व्या, कोलकाता २०७ व्या व पुणे शहर २०५ व्या स्थानी आहे. स्वप्ननगरी व देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारी मुंबई शहर यंदाच्या यादीत तब्बल ११ क्रमांकांनी पुढे जात १३६ व्या स्थानी पोहोचले आहे. आशियामध्ये, मुंबई आणि नवी दिल्लीने क्रमवारीत वरची वाटचाल अनुभवली आहे. या यादीनुसार, मुंबई आशियातील २१ वे सर्वात महागडे शहर ठरले आहे, तर नवी दिल्ली आता आशियातील महाग शहरांच्या यादीत ३० व्या स्थानी पोहोचलेले शहर ठरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिल्ली, मुंबई व पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये राहणीमानाचा खर्च वाढण्यापाठी अनेक कारणे आहेत. या शहरांमधील रोजगार वाढल्याने मध्यमवर्गातील नागरिकांची खर्चाची क्षमता सुद्धा वाढली आहे. दुसरीकडे बहुतेक चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलर मजबूत होत असूनही, भारतीय रुपयाचे मूल्य हे तुलनेने स्थिर राहिले आहे परिणामी भारतीय शहरांमधील खर्चात तुलनेने कमी घट दिसून आली आहे.

मर्सर येथील इंडिया मोबिलिटी लीडर राहुल शर्मा यांनी या निष्कर्षांबाबत सांगितले की, “जागतिक आर्थिक आव्हानांचा सामना करताना, आमच्या २०२४ च्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्व्हेमध्ये भारताची स्थिती बऱ्यापैकी स्थिर राहिली आहे. खर्चाच्या बाबत मुंबईच्या रँकिंगमध्ये वाढ होऊनही, भारतीय शहरांची एकूण ‘परवडणारी’ क्षमता कायम असल्याने बहुराष्ट्रीय संस्था किंवा जागतिक स्टेटस मिळवू पाहणाऱ्या भारतीय कंपन्यांसाठी हे शहर फायदेशीर ठरतेय.

शर्मा यांनी पुढे भारताच्या आर्थिक सामर्थ्यावर भर देत असेही सांगितले की, “देशांतर्गत घरगुती स्तरावर वाढती मागणी व मजबूत सेवा क्षेत्रामुळे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था जागतिक प्रतिभेसाठी एक स्थिर वातावरण निर्माण करतेय. महागाईचा दर व घराच्या वाढत्या किमतीबाबत चर्चा करताना शहरातील सुधारित राहणीमानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हे शहर आकर्षणाचा बिंदू ठरत आहे हे सुद्धा विसरून चालणार नाही.”

भारतीय शहरांमधील वस्तूंचे दर

1)पर्सनल केअर वस्तू मुंबईत सर्वात महाग आहेत, त्यानंतर चेन्नईचा क्रमांक लागतो, तर कोलकातामध्ये सर्वात कमी किमतीत वस्तू मिळतात.

2)मुंबई आणि पुण्यात ऊर्जा आणि उपयोगिता खर्च सर्वाधिक आहेत.

3)दूध, दुग्धजन्य पदार्थ, ब्रेड, शीतपेये, तेल, फळे आणि भाज्या यासह किराणा माल कोलकातामध्ये सर्वात कमी दरात उपलब्ध आहे, त्यानंतर पुण्याचा क्रमांक लागतो.

4)मुंबई आणि त्यानंतर बंगळुरूमध्ये वाहतूक खर्च सर्वात जास्त आहे.

5)दिल्लीत अल्कोहोल आणि तंबाखू सर्वात कमी महाग आहेत, जरी चेन्नईमध्ये गेल्या वर्षभरात किंमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

घरांच्या भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे, विशेषत: दिल्लीत (१२-१५ टक्के), मुंबईतही (६-८ टक्के) वाढ झाली आहे, तर कोलकात्यात २ टक्क्यांपेक्षा कमी वाढ झाली आहे.

हे ही वाचा<< आदिमानवाच्या काळातही ‘मुंबई’ शहरात होते कारखाने! काय आहे मुंबई अन् अश्मयुगाचा संबंध जाणून घ्या

दरम्यान, मर्सरचे कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण त्याच्या सर्वसमावेशक विश्लेषणासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाच्या सर्वेक्षणात जगभरातील २२६ शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामध्ये घर, वाहतूक, अन्न, कपडे, घरगुती वस्तू आणि करमणूक यासह २०० पेक्षा जास्त वस्तूंच्या किंमतीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.