Luxury Housing Price: जगभरात लक्झरी घरांची मागणी वाढत असून, त्याबरोबरच त्यांच्या किमतीही वाढत आहेत. जगभरातील आलिशान घरांच्या वाढत्या किमती पाहता टॉप ५ शहरांच्या यादीत एका भारतीय शहराचे नावही आले आहे. विशेष म्हणजे हे शहर दुसरे तिसरे कोणी नसून, देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे. रिअल इस्टेट सल्लागार कंपनी नाइट फ्रँकने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये त्यांनी जगातील अशा ४६ शहरांची यादी जाहीर केली आहे, जिथे जुलै ते सप्टेंबर २०२३ या तिमाहीत लक्झरी घरांच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे.

मुंबई सध्या कोणत्या स्थानी?

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, आलिशान घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत मुंबई जगात चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई २२ व्या स्थानावर होती. अशा स्थितीत शहरातील आलिशान घरांच्या किमती वाढल्यानंतर त्यात १८ स्थानांनी झेप घेतली आहे. या वर्षी मुंबईतील आलिशान घरांच्या किमती ६.५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुंबईशिवाय देशातील इतरही अनेक शहरे आहेत जिथे आलिशान घरांच्या किमतीत वाढ झाली आहे.

in Mumbai 55 percent increase in price of affordable homes
मुंबई महानगरातील परवडणाऱ्या घरांच्या किमतीत ५५ टक्के वाढ!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Panvel Municipal Commissioner decision to build infectious disease hospital in Kalamboli
कळंबोलीत साथरोग रुग्णालय; पनवेल महापालिका आयुक्तांचा निर्णय, २७ कोटींचा खर्च अपेक्षित
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
Panvel Virar House expensive , House expensive Panvel,
पाच वर्षात पनवेल, विरारची घरे महागली; दोन्ही ठिकाणच्या किमतीत ५८ टक्क्यांनी वाढ
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
pimpri chinchwad property tax marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये अडीच लाख मालमत्ताधारकांनी बुडविला कर
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

हेही वाचाः कर्मचाऱ्यांच्या बोनसने बाजारात आणली समृद्धी, दिवाळीत साडेतीन लाख कोटींचा व्यवसाय होणार

आलिशान घरांच्या किमतीत ४.१ टक्क्यांची वाढ

मुंबई व्यतिरिक्त राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि आयटी सिटी बंगळुरूमध्येही आलिशान घरांच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. दिल्ली-एनसीआर भागात आलिशान घरांच्या किमतीत ४.१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यंदाच्या नाइट फ्रँक इंडियाच्या यादीत ते दहाव्या स्थानावर आले आहे. तर गेल्या वर्षी दिल्ली या यादीत ३६ व्या क्रमांकावर होती. बंगळुरूबद्दल बोलायचे झाल्यास आलिशान घरांच्या किमतीत २.२ टक्के वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षीच्या २७ व्या स्थानाच्या तुलनेत ते यंदा १७ व्या स्थानावर आले आहेत.

हेही वाचाः जगातील कोणताही देश ‘या’ बाबतीत भारताची बरोबरी करू शकणार नाही

या शहरांमध्येही आलिशान घरांच्या किमती खूप वाढल्यात

फिलिपिन्सची राजधानी मनिला या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे आलिशान घरांच्या किमतीत २१.२ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. तर या यादीत दुबई १५.९ टक्क्यांच्या वाढीसह दुसऱ्या स्थानावर आहे. शांघायमधील आलिशान घरांच्या किमती गेल्या एका वर्षात १०.४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. या यादीत स्पेनची राजधानी माद्रिदचेही नाव समाविष्ट असून, येथील आलिशान घरांच्या किमतीत ५.५ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.

Story img Loader