मुंबई : म्युच्युअल फंड हा गुंतवणूक पर्याय सर्वतोमुखी करणाऱ्या नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढतच असून, सरलेल्या जून महिन्यात त्यायोगे २१,२६२ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. मे महिन्यातील २०,९०४ कोटी रुपयांपेक्षा सरलेल्या महिन्यातील ओघ अधिक राहिला आहे, अशी माहिती म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था – ‘ॲम्फी’ने मंगळवारी दिली.

‘ॲम्फी’द्वारे जाहीर आकडेवारीनुसार, जूनअखेर ‘एसआयपी’ खात्यांची संख्याही ८.९८ कोटी अशी विक्रमी स्तर गाठणारी आहे. या महिन्यांत एकूण ५५ लाख लाख नवीन ‘एसआयपी’ खात्यांची भर पडली आहे. ‘एसआयपी’ खात्यांची वाढती संख्या आणि विक्रमी योगदानातून गुंतवणूकदारांमधील वाढती विश्वासार्हता निदर्शनास येते. ‘एसआयपी’च्या खात्यांमधील व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता (एयूएम) १२.४३ लाख कोटी रुपये झाली आहे, ज्याने भांडवली बाजारातील तेजीलाही इंधन पुरविले आहे, असे ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकट चालसानी म्हणाले.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Property worth 61 crore seized during elections period from backward Vidarbha
मागास विदर्भ निवडणूक काळात संपन्न, ६१ कोटींची मालमत्ता जप्त
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ

हेही वाचा >>> Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! दरवाढीनंतर सोन्याच्या दरात घसरण, १० ग्रॅमची किंमत ऐकून होऊ लागली गर्दी

इक्विटी म्हणजेच समभागसंलग्न म्युच्युअल फंडांनी जूनमध्ये ४०,६०८.१९ कोटी रुपयांचा ओघ अनुभवला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे मे महिन्यात तो ३४,६९७ कोटी रुपये नोंदवला गेला होता. जूनमध्ये त्यात १७ टक्क्यांची भर पडली आहे. तर, या महिन्यात डेट अर्थात रोखेसंलग्न फंडांनी १,०७,३५७.६२ कोटी रुपयांचे निव्वळ निर्गमन अनुभवले.

इक्विटी फंडात, मल्टीकॅप श्रेणीतील प्रवाह ७८ टक्क्यांनी वाढून ४,७०८.५७ कोटी रुपयांवर पोहोचला. याव्यतिरिक्त, लार्जकॅप फंडातील गुंतवणूक ४६ टक्क्यांनी वाढून ९७०.४९ कोटी रुपये झाली आहे. तथापि, स्मॉलकॅप फंडाच्या गुंतवणुकीत १७ टक्क्यांनी घसरण होऊन ती २,२६३.४७ कोटी रुपये, तर मिडकॅप फंडातील गुंतवणूक ३ टक्क्यांनी घसरून २,५२७.८४ कोटी रुपयांवर सीमित राहिली. एकूणच, ओपन-एंडेड म्युच्युअल फंडांतून सरलेल्या जून महिन्यात ४३,१०८.८० कोटी रुपये काढून घेण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, ओपन-एंडेड इक्विटी फंडातील गुंतवणूक सलग ४० व्या महिन्यात सकारात्मक राहिली आहे.

हेही वाचा >>> वर्षभरात ४.६७ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती – रिझर्व्ह बँक; गेल्या आर्थिक वर्षात रोजगार वाढीचा दर ६ टक्क्यांवर

‘एनएफओ’चे योगदान मोठे

‘ॲम्फी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी फंडांमधील सर्वाधिक प्रवाह सेक्टोरल/थीमॅटिक फंडांद्वारे आला. या श्रेणीमध्ये जूनमध्ये २२,३५१.६९ कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक झाली. नवीन फंड प्रस्तुती अर्थात एनएफओद्वारे सेक्टोरल/थीमॅटिक फंडांमध्ये होणारा ओघ वाढला आहे. जूनमध्ये दाखल झालेल्या नऊ नवीन फंडांनी १२,९७४ कोटी रुपयांची गुंतवणूक मिळविली.

एकूण ‘एयूएम’ ६० लाख कोटींपुढे

भारतीय गुंतवणूकदारांनी देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि बाजारांवर विश्वास दाखविल्याचे आश्वासक चित्र आहे. परिणामी म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण गंगाजळी (एयूएम) जूनमध्ये ६१.३३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मात्र कंपन्यांकडून आगाऊ कर भरणा झाल्याने, रोखेसंलग्न फंडांमधून मोठा निधी गुंतवणूकदारांनी काढून घेतला आहे. ‘एयूएम’ने ६० लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे.