नगरनार स्टील प्लांटने काल हॉट मेटलच्या उत्पादनाच्या केवळ ९ दिवसांनंतर एचआर (हॉट रोल्ड) कॉइलचे अंतिम उत्पादन तयार करण्याचा विक्रम नोंदवला आहे. पोलाद क्षेत्रात आजवर हे उत्पादन घेणे अशक्य समजले जात होते. खाण क्षेत्रातील राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ या कंपनीला स्टील बनवण्याचा पूर्वीचा कसलाही अनुभव नाही, त्यामुळे एनएमडीसी (NMDC) च्या या उत्पादनची गणना विक्रमाच्या यादीत केली जात आहे.

“राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ आता भारतीय पोलाद निर्मात्यांच्या प्रतिष्ठित गटात सामील झाले. बस्तरचा स्थानिक समुदाय गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होता त्याची ही पूर्तता आहे.”, असे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक अमिताभ मुखर्जी यांनी नमूद केले. हॉट झोनमध्ये तीन महत्वपूर्ण युनिट्स – ब्लास्ट फर्नेस, स्टील मेल्टिंग शॉप आणि मिल्स (थिन स्लॅब कॅस्टर – हॉट स्ट्रिप मिल) इतक्या कमी कालावधीत सुरू करणे ही एक दुर्मिळ कामगिरी आहे, असे मत या उद्योगातील दिग्गजांनी नोंदवले आहे.

In politics of district Mamu factor implemented in Akot constituency once again come into discussion
‘मामु’ फॅक्टर चालणार?, दलितांसह इतरांचे एकगठ्ठा मतदान…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
maharashtra assembly election 2024 many agricultural work disrupted due to election campaigning
प्रचारामुळे शेतीकामे ठप्प! शेतमजुरी ३००; तर राजकीय पक्षांकडून जेवणासह ४०० रुपये
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा

हेही वाचाः मुंबईतील आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवासाठी प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांच्या अध्यक्षतेखाली फाऊंडेशनची स्थापना होणार

पोलाद प्रकल्प अंदाजे २४,००० कोटी रुपये खर्चून बांधला गेला

३ दशलक्ष टन वार्षिक क्षमतेचा पोलाद प्रकल्प अंदाजे २४,००० कोटी रुपये खर्चून बांधला गेला आहे. हा प्रकल्प हॉट रोल्ड बाजारामध्ये त्याच्या उच्च दर्जाच्या हॉट रोल्ड (HR) स्टीलच्या भांडारासह आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा प्रकल्प सर्वात आधुनिक मिलसारख्या तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक प्रमुख उपभोगी क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करेल. लोहखनिज पुरवठा जोडणीमुळे नगरनार स्टील प्लांटचा स्पर्धात्मक फायदा नगरनारपासून जेमतेम १०० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बायलादिला खाणीलाही होणार आहे.

हेही वाचाः ‘मेरा बिल मेरा अधिकार’च्या माध्यमातून १ कोटीपर्यंतची बक्षिसे जिंकता येणार, जाणून घ्या संपूर्ण पद्धत

देशांतर्गत पोलाद उद्योग याला अभूतपूर्व यश मानत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खाण कंपनीने उभारलेला एकमेव पोलाद कारखाना म्हणून नगरनार स्टील प्लांटला वेगळेपण लाभले आहे. १५ ऑगस्ट रोजी हॉट मेटलचे उत्पादन सुरू झाल्यानंतर ९ दिवसांनी काल पहिल्या हॉट रोल्ड कॉइलच्या निर्मितीसह नगरनार स्टील प्लांटने आणखी एक विक्रम केला आहे, असे या उद्योगातील दिग्गजांना वाटते. सामान्यत: ब्लास्ट फर्नेसचे कार्य सुरळीत होण्यासाठी काही आठवडे लागतात, त्यानंतरच स्टील मेल्टिंग शॉपच्या कामकाजाबरोबर ब्लास्ट फर्नेस उत्पादनाचा समन्वय साधला जातो. काल एचआर कॉइलचे उत्पादन सुरू झाल्यानंतर या उत्पादनाचे लवकरात लवकर व्यावसायिकीकरण होईल हे सुनिश्चित करण्यासाठी हा कारखाना आता उत्पादन प्रक्रियेच्या स्थिरीकरणात गुंतलेला आहे.