लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी  
मुंबई: ई-कचऱ्याचे संकलन, विल्हेवाट आणि पुनर्वापर क्षेत्रात २०१४ पासून कार्यरत कंपनी नमो ई-वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड भांडवली बाजारात प्रवेश करीत असून, कंपनीची ‘एसएमई आयपीओ’ बुधवार, ४ सप्टेंबरपासून  गुंतवणुकीस खुला होईल आणि ६ सप्टेंबरला बंद होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेम सिक्युरिटीज या आयपीओचे व्यवस्थापन पाहात असून, गुंतवणूकदारांना प्रति समभाग ८०-८५ रुपये प्रत्येकी किमतीदरम्यान बोली लावता येईल. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर सूचीबद्ध केले जातील. भागविक्रीतून मिळणाऱ्या निधीचा वापर टेकको वेस्ट मॅनेजमेंट एलएलपी या उपकंपनीला वित्तपुरवठा करण्यासाठी, नाशिकमध्ये नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आणि खेळते भांडवल यासह इतर कामांसाठी वापरला जाईल.

हेही वाचा >>>मिश्र इंधन वाहनांवरील जीएसटी कमी करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज्यांच्या अर्थमंत्र्यांना आवाहन

इलेक्ट्रॉनिक उपकऱणे, संगणक, मोबाईल यासारख्या आपल्या सध्याच्या आधुनिक जीवनशैलीची गरज बनलेल्या वस्तू नादुरूस्त झाल्यास, त्यांची योग्य रीतीने विल्हेवाट न लावली गेल्यास त्यातून गंभीर पर्यावरणीय धोके संभवतात. या वस्तूंसह,  एअर कंडिशनर्स, रेफ्रिजरेटर्स, लॅपटॉप, फोन, वॉशिंग मशीन, पंखे आदींच्या पुनर्वापरासाठी सेवा या कंपनीकडून प्रदान केल्या जातात. हरियाणातील फरिदाबादमध्ये २,५६६ चौरस मीटर आणि पलवलमध्ये १६,०१० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले कंपनीचे स्टोरेज आणि डिसमँटलिंग केंद्र सध्या सुरू आहे.